अहमदनगर : केंद्र सरकारने दुजाभाव केला असता, तर राज्य लसीकरणात आघाडीवर असते का, अशी विचारणा भाजपने केली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते लस पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत आहेत. तर दुसरीकडे राज्य लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
दुःखद ! प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन, एकूण ६५ पत्रकारांचा मृत्यू https://t.co/iVYVdYGhIm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, देशातील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मात्र, कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील पात्र व्यक्तींचे लसीकरण शक्य नसल्याचे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात असताना, केंद्र सरकारने दुजाभाव केला असता, तर राज्य लसीकरणात आघाडीवर असते का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास #surajyadigital #वेळ #विश्वास #सुराज्यडिजिटल #time #lockdown #लॉकडाऊन #मुख्यमंत्री #ठाकरे pic.twitter.com/jXjGufWUbv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. लस पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, तर दुसरीकडे राज्य लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहेत. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का? अशी विचारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
सोलापुरातील एसटी वाहक महिलेचा कोरोनामुळे मृत्यू https://t.co/NgD5SRQ93Y
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. असे असूनही केंद्र सरकार लसीकरणात दुजाभाव करते हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.
महसूल मंत्र्यांनी लिहिलेले हे पत्र म्हणजे स्वत:ची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून करोनाचे संकट आहे. महसूल मंत्र्याना सुविधांचा अभाव असल्याचे आता कळाले काॽ फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
करकंबच्या जि.प. शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर
https://t.co/KZmX0SMavp— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021