मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व आमदार आणि खासदार आपला एका महिन्याचा पगार मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. तसेच, राष्ट्रवादी पक्षाकडून 1 कोटी रुपयांची स्वतंत्र मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोट लिहून यासंदर्भात पक्षाला सूचना केली होती.
कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास #surajyadigital #वेळ #विश्वास #सुराज्यडिजिटल #time #lockdown #लॉकडाऊन #मुख्यमंत्री #ठाकरे pic.twitter.com/jXjGufWUbv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी
मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मदतीचा मोठा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे.
महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना संदर्भात जनतेशी साधलेला संवाद #मुख्यमंत्री #संवाद #ठाकरे #surajyadigital #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/gi50j6Ekmb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का?' https://t.co/aqT2yzocOe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन, जयंत पाटील यांनी केलं.
आदरणीय खा. शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे… pic.twitter.com/8LvVOUmnFU
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 30, 2021
महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले.
महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे, यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले.
माझ्या स्वतःच्या एक वर्षाच्या आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये, @INCMaharashtra
तर्फे ५ लक्ष रूपये व अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत. pic.twitter.com/nRknwBmThT— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 29, 2021
* बाळासाहेब थोरातांची मोठी मदत
दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. थोरात यांनी स्वत:चं एक वर्षाचं आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर थोरातांच्या अमृत उद्योग समूह संगमनेरच्या 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाचे पैसेही सीएम फंडात देण्यात येणार आहेत.
दुःखद ! प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन, एकूण ६५ पत्रकारांचा मृत्यू https://t.co/iVYVdYGhIm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021