मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ याने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षाने माझा नंबर लीक केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 500 हून अधिकवेळा बलात्कार आणि हत्येची धमकी देणारे फोन मला आले, असं सिद्धार्थने म्हटलं आहे.
योगी सरकारच्या अॉक्सिजनविषयी आदेशावर या तरुणीचा तोल सुटला, कोणते शब्द आले तोंडी #up #YogiAdityanath #yogi #oxygen #surajyadigital #योगी #सरकार #सुराज्यडिजिटलhttps://t.co/NEh9hqa8uA
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
अभिनेता सिद्धार्थने ट्विट करून सांगितले की, ‘तमिळनाडूतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि आयटी सेलने माझा मोबाईल नंबर लिक केला. मला 24 तासांत जवळपास 500 कॉल आले असून त्यात मला आणि माझ्या परिवाराला जिवे मारण्याची, बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली.
तसेच मी शांत बसणार नाही, असं तो म्हणाला. त्यानंतर नेटकरी त्याच्या समर्थनार्थ पुढे आले. तसेच ट्विटरवर #IStandWithSiddharth हॅशटॅग सुरू झाला. सिद्धार्थने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत याबाबत ट्वीट केलं आहे.
https://twitter.com/Actor_Siddharth/status/1387653507814072325?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1387653507814072325%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, “भाजपा सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५००हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा”.
माझ्या घरचे लोक मरत आहेत, प्लीज मदत करा – प्रियांका चोप्रा https://t.co/shqM9MCZAl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
या त्याच्या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही टॅग केलेलं आहे. त्याच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट केलं असून अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी, श्रेया धन्वंतरी यांनी त्याच्या या ट्विटवर त्याला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. त्याचं हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.