मुंबई : सध्या देशात कोरोना संकटामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी सचिन तेंडुलकरने 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 पेक्षा जास्त उद्योजकांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत गोळा करण्यासाठी मिशन ऑक्सिजन’ मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सचिनने ही मदत केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचे भाजपवर गंभीर आरोप, म्हणून ट्विटरवर ट्रेण्ड होतोय #IStandWithSiddharthhttps://t.co/jLf2n6Nl47
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. देशात सध्या मेडिकल ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थित कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच भारतातील अनेक दिग्गज खेळाडू, सेलिब्रेटीदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. दिग्गज क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकरदेखील यात मागे राहिलेला नाही. सचिनने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःचे योगदान देत 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. सचिनने गेल्या वर्षीदेखील अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता.
ऑक्सीजनसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट लीने भारताला दिले 44 लाख रुपये, पॅट कमिन्सने दिले 37 लाख https://t.co/eRc4w4Ay1Q
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
सचिन तेंडूलकरने मिशन आँक्सिजन इंडीयाला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीतील 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. सचिन तेंडुलकरप्रमाणे इतर काही भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी यापूर्वीच आपआपल्या परीने मदत केली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, महिला क्रिकेटपटू मिताली राज हिनेदेखील कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत केली आहे.
विस्फोटक फलंदाज रोहित शर्माने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 45 लाखांची मदत केली आहे. शिवाय त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले आहेत. तसेच त्याने Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs संस्थेला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. रोहितनं एकूण 80 लाखांची मदत केली आहे.
जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट? उद्धव ठाकरेंनी तातडीने दिला मोठा आदेश https://t.co/9sfHz7PTK7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021