मुंबई : मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही वाशीत सभास्थळी आले. Chief Minister broke the hunger strike of Manoj Jarange, warning of Manoj Jarange Patil यावेळी मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माला अर्पण केली. त्यानंतर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपले उपोषण सोडले. तसेच शिंदेंच्या हस्ते जीआर स्विकारला. दरम्यान, राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारकडून तसा अध्यादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठे यश आले आहे. रात्रभराच्या हालचालीनंतर सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करुन जीआर जारी केला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर मराठा बांधवांचा जल्लोष सुरु आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत येऊन जरांगेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगे उपोषण मागे घेतला. त्यानंतर त्यांची विजयी सभा झाली. जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली.
सभेआधी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जीआर स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पेढा भरवला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल उधळण्यात आला. जरांगे पाटील यांना यावेळी तलवार देखील भेट देण्यात आली. जरागेंनी मुख्यमंत्री शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी वाशीपर्यंत पोहचलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाबाबत जीआर निघाल्यानंतर आनंद व्यक्त केला. हा मराठ्यांचा विजय आहे, असे ते म्हणाले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोलताना जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. हा जीआर कायमस्वरुपी ठेवा, उद्या जर यामध्ये काही अडचणी आल्या तर मी सर्वात आधी आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी येणार, असेही जरांगे यांनी म्हटले.
वाशीमध्ये थोड्याच वेळात मनोज जरांगे- पाटील यांची सभा होणार आहे. या सभेला मराठा बांधवांनी अलोट अशी गर्दी केली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुर्णता भगवामय झाला आहे. चौकात गर्दी मावत नसताना शेजारी बांधकाम सुरू असलेल्या भल्यामोठ्या इमारतीत मराठा बांधव गर्दी करत आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजेरी लावणार आहेत.
मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य करत सरकारची चिंता वाढवली आहे. मराठा आंदोलन संपवत नसून त्याला स्थगिती देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठे एवढ्या ताकदीने मुंबईत आले की, या ताकदीमुळे आज आदेश निघाला आहे. अन्यथा हा आदेश निघाला नसता. मराठे चारही बाजूंनी मुंबईत घुसू लागले आणि सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आंदोलन संपले नसून, आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले. शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली. तसेच दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच संपूर्ण जगाचे या आंदोलनाकडे लक्ष होते. आरक्षणाबाबत दिलेला शब्द मी पाळला, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी साडेचार महिन्यांपासून लढा सुरु आहे, आरक्षणासाठी 300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या, 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीरे सुरु आहेत, अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली. ते वाशीत बोलत होते. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्याबद्दल आभारही मानले, तसेच शिंदे समितीला वर्षभर काम करु द्या, मराठवाड्याचे 1884चे गॅझेटही लागू करावे, असेही यावेळी जरांगे म्हणाले.
नवी मुंबईत विजयी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार. ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका न पोहचता हे आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार, असे शिंदे म्हणाले. तसेच आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मदत करणार असेही ते म्हणाले. तसेच आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे गुलाल उधळण्याचा दिवस आहे. आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या, असेही शिंदेंनी सांगितले.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे- पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. यानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भातील नवा अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ मध्यरात्री जरांगेंच्या भेटीला गेले होते. मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य केली.
○ मनोज जरांगेंच्या मागण्या काय?
नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या.
कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा.
राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
वर्ग 1, 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठ्यांना आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने पूर्ण झाला असून 54 लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या वेशीवर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगे पाटील यांनी काल (26 जानेवारी) 13 मागण्या करत राज्य सरकारला आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये अत्यंत काथ्याकूट झालेल्या सगेसोयरे हा कळीचा मुद्दा होता. या मुद्यावरून सरकारने एक माघार घेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करत राज्य सरकारने जीआर मध्यरात्रीच काढण्यात आला. सोबतच नोंदी सापडलेल्यांच्या सगसोयऱ्यांनाही लाभ होणार असल्याने जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारने जे निर्णय घेतले त्यामध्ये, कुणबी प्रमाणपत्र देण्याचं शिंदे समितीला मुदतवाढ, प्रमाणपत्र देण्याचं शिबीर घेण्यासाठी अधिसूचना, नोंदी शोधण्यासाठी समिती, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर कायद्याच्या चौकटीत टिकणारं, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असं मराठा आरक्षण ज्या ओबीसींना सवलती मिळतात, त्या सवलती मराठ्यांना दिल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.