सांगली : सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर गार्डी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. Shinde group MLA Anil Babar merged with Anant, Khanapur sangli’s dream of ministerial post unfulfilled यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार विश्वजित कदम यांसह हजारोंचा समुदाय उपस्थित होता. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्युमोनिया झाल्याने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख होती. आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक व्यक्त केला. ‘त्यांच्या निधनाने शिवसेनेचा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी व मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.’ अशी भावना त्यांनी ‘X’ वर पोस्ट करुन व्यक्त केली.
आमदार अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी सदाशिव पाटलांचा पराभव केला होता. ते 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा आमदार राहिलेत. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गार्डी येथील जीवन प्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी विट्यापासून गार्डीपर्यंत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघाली. बाबर यांचे पार्थिव सांगलीतील हॉस्पिटलमधून विटाकडे रवाना झाले. अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्री उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्य मंत्रीमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. न्यूमोनिया झाल्याचे त्यांच्यावर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. या बैठकीत अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता होती. उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे.
अनिल बाबर यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. सांगली जिल्हा परिषदेपासून १९७२ला त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. १९८१ मध्ये ते सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी १९९० साली प्रवेश केला. १९९९ ला पुन्हा आमदार म्हणून त्यांची निवड झाली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली होती. नव्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. पण त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले.