सोलापूर : देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. Budget Nirmala Sitharaman to build 2 crore houses in rural areas in 5 years प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी 2 कोटी घरे बांधली जातील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच आमचे सरकार सामान्य लोकांच्या जीवनात बदल आणण्याची गॅरंटी देत आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्राच्या विकासाच्या संकल्पासह काम करत आहोत, असेही यावेळी सीतारमण म्हणाला.
अंतरिम अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी, जगात भारताला तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याचनुसार हा अर्थसंकल्प आहे. भारताचा हे अर्थसंकल्प आर्थिक क्षेत्राला मजबूत करणारा आहे, पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पात सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, विमान सेवा सुधारतील, असे ते म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी सर्वांगीण, सर्वस्पर्शी व सर्वसमावेशक असे काम सरकार करत आहे, अशी ग्वाही दिली. सामाजिक न्याय ही अनेकांसाठी राजकीय घोषणा होती, पण आमच्यासाठी हा कामाचा मूळ भाग आणि हेतू आहे, असे त्या म्हणाला. तसेच त्यांनी आतापर्यंत सरकारने पीएम किसान, मोफत रेशन तसेच युवकांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
भारतात ब्रिटीश राजवटीपासून सन 2000 पर्यंतचा अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता, जेणेकरून ब्रिटिश खासदारांचे भाषण ऐकता येईल. खरं तर, भारतात संध्याकाळी 5 वाजलेले असतात, तेव्हा लंडनमध्ये सकाळचे साडेअकरा वाजलेले असतात. 2001 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा संपवून पहिल्यांदाच सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ अंतरिम बजेट – 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य
* निर्मला सीतारमण म्हणाल्या..
* गेल्या 10 वर्षात देशात मोठा विकास झाला आहे.
* देशातील 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले
* भारत विकसित राष्ट्र होणार, लोकांच्या सशक्तीकरणासाठी आमचे काम सुरु
* सर्वांना सर्व गोष्टी मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न सुरु
* आम्ही भ्रष्टाचार संपवला आहे.
* आमच्या कामांमुळे आम्हाला जनता पुन्हा संधी देईल.
* पीएम केअर रिफॉर्म योजनेत दरवर्षी 8 कोटी शेतकऱ्यांना फायदा.
* 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा फायदा
* 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्याचे ध्येय.
* ग्रामीण भागासाठी विविध योजना राबवल्या
* गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त
* महिला उद्योजकांना 30 कोटी मुद्रा योजना कर्ज दिली.
* सामाजिक न्याय हे आमच्या सरकारचे धोरण
* जास्तीत जास्त नोकऱ्या तयार करण्याचे ध्येय
* गेल्या दहा वर्षांत कामात पारदर्शकता आणली
*Governance, Development & Performance – या GDP वर आम्ही भर दिला.
* अन्नदाता शेतकऱ्यांसाठी MSP मध्ये वाढ केली.
* ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढवले.
* उच्च शिक्षणात महिलांचा समावेश 28 टक्क्यांनी वाढला
* अमृतकालमध्ये शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, उत्पादकता वाढवणे, संसाधनांमध्ये गुंतवणूक या गोष्टींचा समावेश असेल.
* स्किल इंडिया मिशनअंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण
* 3 हजार नवीन आयटीआय स्थापन केल्या
* 7 आयआयटी, 16 आयआयआयटी, 7 आयआयएम, 15 एम्स व 390 विद्यापीठांची स्थापना.
○ अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात घसरण
नरेंद्र मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. सकाळी तेजीत सुरु झालेला शेअर बाजार हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 130 अंकांची घसरण झाली असून तो 71,622.27 अंकांवर सध्या व्यवहार करत आहे. आज 11 वाजता सेन्सेक्स 72,092 अंकांवर गेला होता. तर निफ्टीमध्येही 27 अंकांची घसरण झाली असून 21,697.80 अंकांवर व्यवहार करत आहे.