सांगली : साधारणपणे आठवड्याच्या अंतराने मी राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या वावड्या उठतात. मी भाजपात जाणअर असल्याच्या अफवा पसरवण्यामागे कोण आहे, ते पत्रकारांनीच शोधावे, असे स्पष्टीकरण खुद्द जयंत पाटील यांनीच दिले. आमचा पक्ष फुटला असला तरी आम्ही तरुणांना संधी देत पक्ष पुन्हा उभा करू आणि लोकसभेला चांगला विजय मिळवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, दर आठ दिवसांनी माध्यमांवर माझ्याबद्दल चर्चा चालू असते. हे का होत आहे, ते तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढले पाहिजे. पत्रकारांनी माझे एवढे काम केलेच पाहिजे. हे कोण घडवून आणत आहे ते शोधून काढले पाहिज.
यावर जयंत पाटील म्हणाले, 17 ते 18 वर्षे राज्याचे मंत्रीपद भुषवले असल्यामुळे माझ्यासाठी मंत्रिपद हे एकमेव प्रलोभन असू शकत नाही. या बातम्यांकडे मीही सकारात्मकतेने पाहतो. या बातम्यांच्या निमित्ताने तेवढाच वेळ आमचा लोकांशी संपर्क होतो. या संपर्काचं श्रेय तुम्हा प्रसारमाध्यमांना द्ययला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.