नवी दिल्ली : कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याचं कामही देशात सुरू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापकांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. पंजाब विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या चमनलाल यांनी यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिलं आहे.
ऑक्सिजनसाठी सचिनकडून 1 कोटींची मदत; मिताली, रोहितसह अनेकांची मदत https://t.co/gvRchyP7s7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
माझं वय आता जवळपास ७४ वर्षे आहे. मला कोरोना लसीची गरज आहे. मात्र माझे काही वैयक्तिक आणि सामाजिक आक्षेप आहेत. पंजाबचा नागरिक म्हणून आणि जगाचा नागरिक म्हणून मी काही आक्षेप नोंदवू इच्छितो. या आक्षेपांमुळेच मी आतापर्यंत कोरोना लस घेतलेली नाही. मी आजही कोरोना लस घेण्यास उत्सुक नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारण कोरोना लसीकरण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोंचा लावण्यात आलेला आहे. हा फोटो प्रमाणपत्रावर अनिवार्य आहे, असं चमनलाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचे भाजपवर गंभीर आरोप, म्हणून ट्विटरवर ट्रेण्ड होतोय #IStandWithSiddharthhttps://t.co/jLf2n6Nl47
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
* इतर देशात लसीकरण प्रमाणपत्रावर राजकीय नेत्याचा फोटो नाही
जगातील इतर कोणत्याही देशात लसीकरण प्रमाणपत्रावर राजकीय नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही, याकडे चमनलाल यांनी लक्ष वेधलं आहे. ‘कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असायला हवी. मात्र भारतातील असहाय जनतेला सत्तेतील नेत्याचा फोटो असलेलं प्रमाणपत्र दिलं जात आहे. याचा मी निषेध करतो. सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे आणि बेजबाबदारपणामुळेच देशात कोरोना बळी गेले आहेत. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी केवळ देशातला सत्ताधारी पक्षच जबाबदार आहे,’ अशा शब्दांत चमनलाल यांनी प्रमाणपत्रावरील फोटोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.