सोलापूर : कोरोना नियंत्रण बैठकीत ग्रामस्थ सूचना मांडत असताना एकजण सूचनांचा भडीमार करीत होता. यावर गटविकास अधिका-याने ओळख विचारली. यावर तो बोगस डॉक्टर असल्याचे समजले. यावर त्या डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुर्दैव ते किती? कोल्हापूरच्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू https://t.co/Knnci5de0S
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी या दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळकवठे येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड हे कोरोना नियंत्रण बैठकीसाठी गेले होते. बैठकीत ग्रामस्थ सूचना मांडत होते. यावेळी एकजण प्रशासनावर सूचनांचा भडिमार करत होता.
अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण, व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय,हर हर महादेव
https://t.co/GubrZElN6V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
तेव्हा या इसमाची ओळख विचारली असता, तो माळकवठे गावात गेली पंधरा वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याची डिग्री गटविकास अधिकारी यांनी तपासून तो बोगस असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हसनसाब मुजावर असे या बोगस डाॅक्टरांचे नांव आहे.
पतीला प्रमोशन देणार नाही; धमकी देत विवाहितेवर बलात्कार, पुण्यातील घटना https://t.co/VmUVYiyZaj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हसनसाब मुजावर हा गेल्या पंधरा वर्षांपासून गावात वैद्यकीय व्यवसाय करत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी उत्सुकतेपोटी त्याचे क्लिनिक तपासण्याची इच्छा व्यक्त केली. क्लिनिकमध्ये औषधे, इंजेक्शन्स, पीपीइ कीट आदी साहित्य आढळून आले.
मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड https://t.co/Dr0hSl9Jyc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
वैद्यकीय पदवीची विचारणा केली असता डॉक्टरांची बोबडीच वळली. थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तगादा लावल्याने नॅचरोपॅथी पदविका प्रमाणपत्र दाखविण्यात आले. अशा प्रमाणपत्रधारकांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. याच पद्धतीने गावातील विश्वनाथ अळळीमोरे यांच्याही बाबतीत तोच प्रकार घडला.
औरंगाबाद : नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम, नातेवाईकच बनतायात 'सुपर स्प्रेडर' https://t.co/3Mus0FqO4r
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021