नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी तर रोजच सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करत आहेत. करोना व्हॅक्सिनच्या किंमतीनंतर त्यावर वसूल करण्यात येण्याच्या कराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी ट्वीटमधून केली आहे.
चुनाव ख़त्म,
लूट फिर शुरू!#PetrolDieselPriceHike— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 6, 2021
सोशल मीडियावरून केंद्र सरकारमधील ध्येय धोरणांवर ते परखड मत मांडतात. करोना संकट आणि केंद्र सरकारच्या उपाययोजना यावरून ते रोजच केंद्र सरकारला खडे बोल सुनावत आहेत. आता पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे.
दुर्दैव ते किती? कोल्हापूरच्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू https://t.co/Knnci5de0S
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं कारण देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरु’ असं ट्वीट केलं आहे. तर त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती असा हॅशटॅग दिला आहे.
पतीला प्रमोशन देणार नाही; धमकी देत विवाहितेवर बलात्कार, पुण्यातील घटना https://t.co/VmUVYiyZaj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
लॉकडाऊनमुळे व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असल्याने आणखी महागाईची झळ सोसावी लागणार आहे.