नवी दिल्ली : गर्भवती महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना वरदान ठरत आहे. ज्या महिला दैनंदिन मजुरीचं काम करतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, अशांसाठी मातृत्व वंदना योजना 2021 अंतर्गत केंद्र सरकारनं नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन केलीय. यासाठी सर्वात आधी लाभार्थ्याला साईटवर लॉगिन करावं लागेल आणि आपलं नाव नोंदवावं लागेल. मात्र 19 वर्षाच्या आतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल वाचा सविस्तर…
थकीत वेतनवाढीसाठी मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर https://t.co/BulcHpAHlh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
गर्भवती महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना वरदान ठरत आहे. ही योजना 2017 ला सुरु करण्यात आलीय. योजनेंतर्गत पहिल्यांदा गर्भवती झाल्यानंतर पोषणासाठी गर्भवती महिलेच्या खात्यात 5 हजार रुपये मिळतात. याचा पहिला हप्ता 1 हजार रुपये गर्भधारण झाल्यानंतर 150 दिवसांच्या आत मिळतो. दुसरा हप्ता 2000 रूपये 180 दिवसांच्या आत मिळतो. तर तिसरा हप्ता बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पहिल्या लसीकरणाआधी मिळतो.
कोरोना महामारीदरम्यान सामान्य माणसांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत, प्रथमच गर्भवती महिलांच्या कल्याणासाठी जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान मातृ वंदना योजना त्यांच्यासाठी वरदान ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्या लाभ घेत आहेत. केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या खात्यात पाच हजार रुपये देत आहे.
महत्त्वाची बातमी; 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार ? https://t.co/iOxWsvTJ4I
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
देशभरात महिला आणि नवजात बालकांच्या भविष्याबद्दल केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पाऊलं उचलत आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या विकासाकडे लक्ष देत सरकारनं PMMVY ही योजना बनवली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 5000 रुपये तीन हप्त्यात दिले जातात. मात्र, 19 वर्षाच्या आतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
@PMMVY_MWCD lt is my question to Honorable minister of women and child development that the scheme PMMVY-CAS is applicable only Delhi and Uttar Pradesh Why? Why not applicable for all states. There all most poor people in our country so I'm requesting to consider all states.Tq.
— javeed khan (@javeedk07) May 9, 2021
या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळतो ज्या दैनंदिन मजुरीचं काम करतात किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. याचा मुख्य उद्देश गर्भवती असताना मजुरी न करता आल्यानं झालेलं नुकसान काही प्रमाणात कमी करणं, हा आहे. ही आर्थिक मदत मिळाल्यानं गर्भवती महिलांना आराम करण्याचा वेळ मिळतो. या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळत नाही, ज्या केंद्र किंवा राज्य सरकारसोबत कोणत्याही उपक्रमात जोडल्या गेल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार नातेवाईकांकडून वसूल करणार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #patient #अंत्यसंस्कार #वसूल #वर्धा pic.twitter.com/724b9TWNIO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
केंद्र सरकार देशभरातील महिला आणि नवजात मुलांच्या भवितव्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. गर्भवती महिला आणि नवजात मुलांचा विकास लक्षात घेता केंद्र सरकारने PMMVY ही योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान देणाऱ्या महिलांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. हे 5 हजार रूपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येत आहे. 19 वर्षांपेक्षा आधी गर्भवती असलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही, अटी या योजनेची अट आहे.
राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता – प्रवीण दरेकर #surajyadigital #healthservices #Pravindarekar #भाजपा #राज्यसरकार #सुराज्यडिजिटल #essentialshttps://t.co/hYMssg6TFL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्यांदा गर्भवतींना आहारासाठी 5 हजार रुपये खात्यात दिले जातात. याचा पहिला हफ्ता एक हजार रूपयांचा असून गर्भधारणेच्या 150 दिवसांच्या आत दिला जातो, तर दुसरी हप्ता 2 हजार रूपयांचा असून 180 दिवसांच्या आत आणि तिसरा हप्ता 2 हजार रुपयांचा दिला जातो तो डिलिव्हरीनंतर आणि जेव्हा बाळाचे प्रथम लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
* योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
मातृत्व वंदना योजना 2021 अंतर्गत केंद्र सरकारने अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली आहे, याचा अर्थ लाभार्थी स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी प्रथम लाभार्थ्यास www.Pmmvy-cas.nic.in वर लॉग इन करून अर्ज करता येणार आहे.
जगाने सुटकेचा निःश्वास सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
https://t.co/x4GNR9h28V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021