मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतू हा लॉकडाऊन 15 दिवस आणखी वाढवण्यात येणार आहे, सर्व मंत्र्यांची अशीच मागणी आहे, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत, अशी माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार, सीआरपीएफच्या निवृत्त जवानाला अटकhttps://t.co/4zDlbRryBJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉकडाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यंत लागू केले आहेत. मात्र इथून पुढे देखील लॉकडाऊन वाढणार का? याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली हाती.
राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय https://t.co/zqBTVYqmhZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
या बैठकीत 31 तारखेपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेणार आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत चर्चा झाली. लॉकडाऊन आणखीन १५ दिवस वाढवला तर कोरोना रुग्णसंख्या अजून आटोक्यात येईल असे अनेक मंत्र्यांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवावा यावर आजच्या बैठकीत मंत्रिमंडळात एकमत झाल्याचं बोललं जात आहे. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते. त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेतला जाऊ शकतो.
कोरोना- जवळपास 100 मृतदेह नदीत वाहून आले, युपी-बिहार हादरले, मृतदेहांनी गंगा झाली मैलीhttps://t.co/i1CzqqGVTY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
आज दुपारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. येत्या 15 मेला आता सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावली कालावधी संपत आहे. महाराष्ट्राच्या शिवाय देशात कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार यासह इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
एसबीआयमध्ये नोकरीची संधी, करा वेळेत अर्ज दाखल
https://t.co/OStBHWPdCj— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
महाराष्ट्रात देखील साधारण मागील कालावधीमध्ये आकडेवारी भलेही कमी होत असले तरी आकडा मात्र 50 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे ठाकरे सरकार लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील काल एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लॉकडाऊनमध्ये वाढ होणार का? याबद्दल आज मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यात हा निर्णय घेतला जाईल अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच सांगतील, अशी माहिती दिली होती.
सोलापूरच्या पाणीप्रश्नावरुन अजित पवारांनी जिल्हाधिका-यांना सुनावले खडेबोल https://t.co/0x9sgqIqOs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021