मुंबई : राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
तसेच बदली झाल्यानंतर पहिली पाच वर्षे जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावे लागत आहे. त्यामध्ये बदल करुन सदरचा कालावधी हा दोन वर्षे करण्यात आला आहे.@AUThackeray @DGPMaharashtra pic.twitter.com/Msjk8qIVZy
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) May 12, 2021
या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयासाठी ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता.
गृहमंत्री @Dwalsepatil जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या SRPF जवानांबाबत बैठकीत जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्यात आली. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्यात आला. pic.twitter.com/GDCkPMzucU
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 12, 2021
त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार, सीआरपीएफच्या निवृत्त जवानाला अटकhttps://t.co/4zDlbRryBJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021