कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे दोन आमदार लवकरच राजीनामा देणार आहेत. आमदार जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडणार आहेत. कारण हे दोघेही आधीपासून खासदार आहेत. जगन्नाथ सरकार हे राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर निसिथ प्रमाणिक कूच बिहार मधून खासदार आहेत. या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं, अशी पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे ते लवकरच राजीनामा देणार आहेत.
उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी, पहा व्हिडिओ https://t.co/4Fz3Hm1FsN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
भाजपचे जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडण्याच्या तयारीत आहेत. हे दोघंही पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी यांच्याकडे येत्या २ आठवड्यात राजीनामा देऊ शकतात. भाजपा नेतृत्वाला वाटतंय की, या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं कारण एका मतदारसंघाऐवजी ७ मतदारसंघात लोकांची काम करून पक्ष वाढवता येईल.
जगन्नाथ सरकार पश्चिम बंगालच्या राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत तर निसिथ प्रमाणिक हे २०१९ च्या निवडणुकीत कूच बिहार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
मुर्शिदाबादच्या शमशेरगंज आणि जंगीपर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या मृत्यूनंतर निवडणूक घेता आली नव्हती. तर उत्तरी २४ परगनाचे खारदा येथे आमदार म्हणून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे काजल सिन्हा यांचं विजयाचा जल्लोष करण्यापूर्वीच निधन झालं.
* फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते
मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार हे आमदारकी कायम ठेवणार की राजीनामा देणार? आता या दोन्ही खासदारांनी पक्षाच्या सांगण्यावरून आमदार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये भाजपाने ४ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यातील २ जण जिंकले तर दोघांचा पराभव झाला.
वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
विजयी उमेदवार निसिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी जर आमदारकी कायम ठेवली तर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात पुन्हा फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते. त्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत २ जागा कायम राहतील का याबाबत भाजपाला चिंता वाटते. कारण २०२१ च्या निकालात चित्र बदललं आहे. ममता बॅनर्जी यांनी २१३ जागा जिंकत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले आहे.
भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021