नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केली आहे. 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रूपयांचा धनादेश मोदींनी हस्तांतरीत केला. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले. यानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रूपये जमा करण्यात आले. 011-24300606, 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही खात्यात पैसे जमा झाले की नाही ते पाहू शकता.
Watch LIVE https://t.co/AyZfA5wcIC
— PMO India (@PMOIndia) May 14, 2021
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांकडून ईद, अक्षय तृतीया, परशुराम जयंतीच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रमजान ईद, अक्षय तृतीया, भगवान परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करत आहे, आपण सर्व एकत्र येऊन या जागतिक महामारीला दूर करु शकतो आणि मानव कल्याणाचे कार्य पुढे नेण्याच्या दिशेने काम करु शकतो’, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज ईद, अक्षय तृतीया, परशुराम आणि बसवेश्वर जयंती, पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शुभेच्छा…#pm #surajyadigital #Eid #सुराज्यडिजिटल #शुभेच्छा #parshuramjayanti2021 #basavjayanti #Jayanti pic.twitter.com/j1cOM7FDCc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम मिळेल. नरेंद्र मोदी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी रुपये वर्गत केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14 हजार मिळाले आहेत.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.
प्रधानमंत्री @narendramodi अब से कुछ ही देर बाद सुबह 11 बजे #PMKisan की 8वीं किस्त देश के करोड़ों किसानों के खातों में डीबीटी के माध्यम से हस्तांतरित करेंगे एवं किसानों साथ संवाद भी करेंगे। इवेंट को लाइव देखें- https://t.co/FMu7bwO7XH pic.twitter.com/3hSZUl0b7A
— MyGov Hindi (@MyGovHindi) May 14, 2021
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.
आज अक्षय तृतीया : या गोष्टी दान केल्या जातात, जाणून घ्या अधिक माहिती https://t.co/PQVhZDq1AB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021