नवी दिल्ली / मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयानं कोरोना लसीकरणाबाबतच्या कॉलर ट्यूनवर कठोर शब्दात टीका केली आहे. तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात लस शिल्लक नसताना तुम्ही केव्हापर्यंत लोकांना त्रास देणार आहात. कोणाला फोन करताच राही कॉलर ट्यून ऐकायला मिळते. जी त्रासदायक आणि एखाद्याला राग आणणारी आहे. कारण यात सांगितलं जातं, की लस घ्या. मात्र, प्रत्यक्षात लसच उपलब्ध नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 'लव यू जिंदगी' या गाण्यासोबत झाली होती लोकप्रिय
https://t.co/24NbJ4YZQF— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
देशभरात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस वापरली जात आहे, परंतु बहुतेक राज्यात लसची कमतरता आहे आणि लोकांना ही लस मिळत नाही. दरम्यान, कोरोना लसीच्या कॉलर ट्यूनवर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक शब्दात फटकारले आहे. कोरोना कॉलर ट्यून त्रासदायक, असल्याचे म्हटले आहे.
श्वेता तिवारीला मारहाण, महिला आयोगाने घेतली दखल https://t.co/k9ReX6Rhqm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले की तुमच्याकडे कोरोना लस पुरेसा प्रमाणात उपलब्ध नसेल, तेव्हा या कॉलर ट्यूनच्या संदेशाद्वारे तुम्ही लोकांना किती काळ त्रास देणार आहात. न्यायमूर्ती विपिन सिंघई आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की कॉल केल्यावर राग येणारी कॉलर ट्यून ऐकायला मिळत आहे की, व्हॅक्सिन घ्या. पण कोण लस घेणार, जर लसच उपलब्ध नसेल तर काय करायचे?
कोव्हिशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, पुनावालांनी केले स्वागत https://t.co/NL6a08oYZA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
लसीच्या अभावावर प्रश्न विचारत खंडपीठाने म्हटले की, ‘हे किती काळ चालणार, हे आम्हाला ठाऊक नाही, खासकरुन जेव्हा सरकारकडे लस नसते. आपण (सरकार) लोकांना लस देत नाही, मोठ्या संख्येने लोक त्याची प्रतीक्षा करत आहेत. यानंतरही, आपण असे म्हणत आहात की लसीकरण करा. अशा संदेशांचा अर्थ काय, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात विचारले. सरकारने अधिक संदेश बनवावेत. असे नाही की आपण एकच संदेश द्या आणि नेहमीच चालू ठेवा. तो खराब होईपर्यंत टेप वाजत राहते. आपणही हा संदेश 10 वर्षे चालवाल.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील https://t.co/s14fkalDtX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021