नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी लसीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनावरील लस विदेशात पाठवल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मलाही अटक करा, असं राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले. दिल्लीत या लसीवरुन पोस्टर झळकले आहेत. यात १५ जणांना अटक केली.
Arrest me too.
मुझे भी गिरफ़्तार करो। pic.twitter.com/eZWp2NYysZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
लस विदेशात पाठवल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत असे पोस्टल लावण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वेगवगेळ्या भागांमध्ये १७ एफआयआर दाखल केल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. दिल्लीत हे पोस्टर कुणाच्या सांगण्यावरून लावले गेले? याचा तपास आता दिल्ली पोलिस करत आहेत. या तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
#NewProfilePic pic.twitter.com/xVkSuREOF0
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2021
राहुल गांधींना बहीण प्रियांका गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदींना लसीच्या मुद्द्यावर पोस्टरमधून सवाल करण्याच्या मुद्द्यावर प्रियांका गांधी यांनी अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. प्रियांका गांधी यांनी पोस्टरचा फोटो आपल्या ट्वीटर हँडलला लावला आहे. राहुल गांधी यांच्या ट्वीटर हँडललाही पोस्टरचाच फोटो आहे.
मोदीजी, आपल्या मुलांची कोरोनावरील लस विदेशात का पाठवली? असे पोस्टर दिल्ली अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना अटक केली आहे. पोस्टबाबत आम्हाला शनिवारी माहिती मिळाली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली गेली. तक्रारींच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी विविध जिल्ह्यांमध्ये १७ एफआयआर दाखल केल्या आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसातील अधिकाऱ्यांनी दिली.