पुणे : सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. आता सध्या एका पिंपरीच्या रिक्षावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक रिक्षा चालक कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ते त्याला चांगलेच महागात पडले आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला आहे.
राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर https://t.co/Ul6ZwqIbf4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
रस्त्यावर शांतपणे उभ्या असलेल्या कुत्र्याला धावत्या रिक्षातून लाथ मारण्याची कुरापत रिक्षा चालकाच्या चांगलीच अंगलट आली. कुत्र्याला लाथाडण्याच्या प्रयत्नात चालकच रिक्षाबाहेर फेकला गेला. तर रिक्षा नियंत्रणाबाहेर जात दुभाजक ओलांडून गेली. पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
नोकरीची संधी; महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती, 26 मे पर्यंत करा अर्ज https://t.co/ClQqaEaI5H
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. दुसरीकडे रिक्षा दुभाजक ओलांडून गेली. यावेळी तिथे उपस्थित काही नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने यावेळी कोणतंही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
पुणे : कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात एक ऑटो रिक्षा चालक तोंडावर आपटला. ही घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडलीय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतोय #dogs #hits #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Riksh #CCTVSharing #ऑटो #रिक्षाचालकhttps://t.co/WMc2KZkRTs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
या अपघाताची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फूटेज शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षा चालकाला मात्र चांगलाच धडा मिळाला. रिक्षावरचा ताबा सुटल्याने रिक्षा दुभाजकावर जोरात आदळली होती. इतकेच नाही तर बराचवेळ रिक्षा थांबतच नव्हती. त्यानंतर आसपासच्या लोकांनी ही रिक्षा थांबवली आहे. हा सर्वप्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.
कोरोना ड्युडी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा; तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाचही नाही, कोरोनाचे काम नाकारणा-या शिक्षकांना पगार नाही https://t.co/uI9g5IP9T2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021