सोलापूर : कोरोना रुग्णांना आता पोस्ट कोविडचा म्युकर मायकोसिस या बुरशी आजाराचा धोका वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव झाला आहे.धक्कादायक म्हणजे सुमारे 50 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासन आणि रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे आठवड्याभरात चार रुग्ण दगावल्याचे वृत्त आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर विनापरवाना उपचार विनित हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा, आर्युवेद शिक्षण आणि बोर्डावर अॅलोपॅथीची डिग्री
https://t.co/EPiB6pUFdC— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
दक्षिण तालुक्यातील हत्तूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये एक आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन, टेंभुर्णी (दोन्ही ता. माढा) येथील महिलेचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे एकूण चार रुग्ण दगावल्याचे वृत्त आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून याची अधिकृत माहिती दिली नाही. म्युकर मायकोसिसने मृत्यू पावलेले रुग्ण प्रारंभी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; व्हॉट्सॲपला स्पष्ट सूचना https://t.co/h0XkvFjs8R
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
टेंभुर्णी (ता. माढा) येथील महिलेचा म्युकर मायकोसीसच्या आजाराने पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला 28 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टेंभुर्णीतच खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 12 मे रोजी अचानक त्या महिलेचा डोळा सुजला. त्यामुळे म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळल्याने त्या महिलेला पुणे येथे हलविले होते. त्या महिलेचे 16 मे रोजी निधन झाले.
कोरोना बरा होण्यापूर्वी अवघ्या दहा दिवसांतच रुग्णांची तब्येत खालावू लागली. तपासणीमध्ये म्युकर मायकोसिसने बाधित झाल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला म्युकर मायकोसीस झाल्याचे सांगितले असले तरी डेथ समरीवर मात्र कोरोनाने मृत झाल्याची नोंद केली आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकावर बडतर्फची कारवाई https://t.co/RbHU4B4mJT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
सिव्हिल व विविध खासगी हॉस्पिटलमध्ये या नव्या आजाराचे रुग्ण आढळले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे या आजाराच्या रुग्णांची माहिती दिली जात नाही. पोस्ट कोवीडमध्ये हा फंगल इंफेक्शन निर्माण करणारा म्युकर मायकोसेस हा आजार आहे. या आजाराचा धोका मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णाला आहे, असे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, यशोधरा हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेला रुग्ण हा 35 वर्षांचा युवक असून त्याला यापैकी कोणतेही आजार नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
'आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात लसीचा दुसरा डोस घेतलाच कसा?' https://t.co/cUKExaokO6
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021