सोलापूर : कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना अशा रुग्णांवर उपचार करुन त्याची माहिती पालिका आरोग्य प्रशासनास न देता कोव्हिड रुग्णाचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात देवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरुन रंगभवन शितलादेवी मंदिर परिसरातील विनित हॉस्पिटल विरुध्द पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; व्हॉट्सॲपला स्पष्ट सूचना https://t.co/h0XkvFjs8R
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
विनीत हॉस्पिटलचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सुर्यवंशी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे या रुग्णालयासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिश बोरोडे, उपायुक्त धनराज पांडे, डॉ. बिरुदेव दुधभाते, लेखापरीक्षक डॉ. वैभव राऊत आदींनी जाऊन पाहणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पदोन्नती आरक्षण – अखेर ठाकरे सरकारचा आदेश रद्द https://t.co/BlM20IvImd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
* आर्युवेद शिक्षण आणि बोर्डावर ॲलोपॅथीची डिग्री
रुग्णालयातील अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. हॉस्पिटलमध्ये संचालक असलेले डॉ. विद्याधर सुर्यंवशी यांचे वैद्यकीय शिक्षण हे आर्युवेद विषयातील आहे. मात्र रुग्णालयाबाहेर असलेल्या बोर्डवर सूर्यवंशी यांनी आपण एम.डी. फिजिशिअन असून हृदयरोग, मधूमेह, फूप्फूस विकार आणि आयसीयू तज्ञ असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आर्युर्वेदाची डिग्री असताना ॲलोपॅथीची डीग्री लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आरोप डॉ. सूर्यवंशी यांच्या विरोधात करण्यात आला आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते, मोजी समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे निधन https://t.co/JMZ7k4ssNe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
* अवैध पद्धतीने उपचार
रुग्णालयांकडे महाराष्ट्र नर्सिग अॅक्टचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मात्र विनित रुग्णालयाकडे हे प्रमाणपत्र नव्हते. तसेच कोरोनाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे देखील आवश्यक आहे. मात्र या रुग्णालयाने महानगरपालिकेकडून देखील कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांवर अवैध पद्धतीने उपचार करत असल्याचा ठपका ठेवत पालिकेच्यावतीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, काँग्रेसच्या टूलकिटवर हल्लाबोल
https://t.co/Z91rFHk9HY— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
* रुग्णालय सील करण्याची कारवाई
हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र, डॉक्टरांचे डिग्री आणि रजिस्टेशन सर्टिफिकेट हे दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. कोविडच्या बाबतीत उपचार करताना शासनाने वेगवेगळ्या सूचना दिल्या आहे. मात्र यापैकी कोणत्याही नियमाचे पालन रुग्णालयतर्फे करण्यात आले नसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर विनित रुग्णालयाने नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करुन रुग्णालय सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
सोलापुरात लॉकडाऊनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी https://t.co/rcia6hI9ya
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
* याच रुग्णालयामुळे घडला प्रकार
सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्यदर्शनसाठी ही गर्दी जमली होती. सोलापूर पोलिसांनी यानंतर करण म्हेत्रे यांच्या घराचा एक किमीचा परिसर सील केला आहे. तसंच ४५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची चाचणी केल्यानंतर एक व्यक्ती करोनाबाधित आढळला आहे. आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मयत करण म्हेत्रेवर विनापरवाना उपचार याच रुग्णालयात झाला. कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना अशा रुग्णांवर उपचार करुन त्याची माहिती पालिका आरोग्य प्रशासनास न देता कोव्हिड रुग्णाचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात देवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा आरोप ठेवला आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकावर बडतर्फची कारवाई https://t.co/RbHU4B4mJT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021