नवी दिल्ली : मोदी सरकारची कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सोलार उपकरणे बसवून सिंचन करू शकतात. यासाठी 60 टक्के अनुदान मोदी सरकार देणार आहे. शेतात अनेकदा वीज किंवा डिझेलवर चालणारा पंप बसवला जातो, जेणेकरून शेताला पाणी देता येई. पण कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही सोलार पॅनल बसवून सिंचन करू शकता. तसेच, अतिरिक्त वीज ग्रीडला पाठवून आणखी कमाई देखील करू शकता.
मोदी सरकार 'ही' मोठी बँक विकणार ! IDBI बँकेतील खातेदाराला याचा कोणताही फटका बसणार नाही #surajyadigital #idbi #आयडीबीआय #सुराज्यडिजिटल #Bank #Modi #Accountant pic.twitter.com/VSblvgHjwf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान योजना नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाने 2020 मध्ये सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या जागेवर सौर पंप बसवून आपल्या शेतासाठी सिंचन करू शकतात. केंद्र सरकारचे उद्दीष्ट हे आहे की या योजनेंतर्गत देशात विद्युत आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपाच्या जागी अशाप्रकारे सौरपंप बसवले जावेत.
कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोना देवीची स्थापना https://t.co/GMfeJBQ29z
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
* या योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार
केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा दोन प्रकारे शेतकरी लाभ घेत आहेत. पहिला फायदा म्हणजे शेतकरी शेतात सिंचनासाठी मोफत वीजेचा वापर करू शकतील. दुसरा फायदा असा आहे की जर शेतकऱ्यांनी अधिकची वीज बनविली आणि ती ग्रीडवर पाठविली तर त्या बदल्यात पैसेही मिळतील. म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. एवढेच नाही तर नापीक जमीन असणारे शेतकरी आपल्या जमिनीचा वापर सौर उर्जा निर्मितीसाठी देखील करू शकतात. म्हणजे नापीक जमीन देखील शेतकर्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बनत आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, खताची बॅग 1200 रुपयांनी स्वस्त https://t.co/ZlsFohB30p
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
* या वेबसाईटला करा व्हिझिट
तुमचे कृषी पंप सौरऊर्जेचे करण्यासाठी सरकारकडून 60 टक्के अनुदान दिले जाईल. ही योजना राज्य सरकारच्या विभागांमार्फत राबविण्यात येत असून त्यामध्ये शेतकऱ्यांना उर्वरित पैकी केवळ 40 टक्के रक्कम विभागाकडे जमा करायची आहे. या विभागांबाबत अतिरिक्त माहिती MNRE ची वेबसाइट www.mnre.gov.in यावर उपलब्ध आहे.
सोलापूर – ओडिसावरुन सोलापूरला अॉक्सिजन एक्सप्रेस दाखल, 93 मेट्रिक टन अॉक्सिजन दाखल, सोलापूरला 26 टन मिळणार, उर्वरित इतर जिल्ह्यांना..माहिती देतायत प्रांतअधिकारी हेमंत निकम #solapur #surajyadigital #oxygen #Express #सोलापूर #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Wc8mkm9NlA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021