ऋषिकेष : चिपको आंदोलनाचे प्रणेते ‘हिमालयाचे रक्षक’ आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं आज कोरोनामुळे निधन झाले. ते 94 वर्षाचे होते. त्यांच्यावर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. बहुगुणा यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बहुगुणा यांच्या निधनावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Long before the Paris Climate Accord or the Greta Thunbergs….. we knew about this crusader with a mission to save trees.
Rest in peace Shri #SunderlalBahuguna… Om shanti🙏 https://t.co/vZKkqdWr6V— SudoSRoy (@SinharoySudipto) May 21, 2021
उत्तराखंडच्या टिहरी येथे 9 जानेवारी 1927 रोजी बहुगुणा यांचा जन्म झाला होता. त्यांनी केवळ पर्यावरणावरच नाही तर अस्पृश्यतेविरोधातही आंदोलन केलं. त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावरही आवाज उठवला. गांधीजींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘हिमालय बचाव’चे काम सुरू केलं. त्यांच्या निधनावर उतराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
@shekhar786g Sir you may like to watch this Video A Tribute to Sunderlal Bahuguna – एक सच्चा प्रकृति प्रेमी !https://t.co/hBQ58r6a2U
— Aditi Chaudhary (@AditiCh23683951) May 21, 2021
कोरोना संसर्गामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुंदरलाल बहुगुणा यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
WE WILL KEEP YOUR LEGECY ON.
RIP Sundarlal Bahuguna
Environmentalist & Chipko movement founder#SunderlalBahuguna #ChipkoMovement pic.twitter.com/jRruAXYiQx— Soumik Ghosh (@im_soumikgh71) May 21, 2021
आयुष्यभर त्यांनी हिमालयाच्या संरक्षणासाठी आंदोलन केलं. त्यामुळे त्यांना ‘हिमालय रक्षक’ म्हणूनही संबोधलं जातं. 1980 मध्येच त्यांनी टिहरी धरणविरोधी चळवळही सुरू केली होती. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1980मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2009 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
राजीव गांधींची हत्या… आज पुण्यतिथी (ब्लॉग) https://t.co/qheRJr0ABf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
सुंदरलाल बहुगुणा हे महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावीत होते. त्यांनी आयुष्यभर गांधीवादाचा अंगिकार केला. त्यांच्या आंदोलनातून वेळावेळी गांधीवाद डोकवायचा. 70 च्या दशकात त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ सुरू केली होती. देशभर या चळवळीचा परिणाम झाला. याच काळात त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची जगानेही दखल घेतली होती. वृक्षतोडी विरोधात हे आंदोलन होतं. मार्च 1974 मध्ये शेकडो स्थानिक महिला वृक्षतोडीचा निषेध म्हणून झाडाला चिपकून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून गाजलं.
अनेकांना गमावलं, मोदींच्या डोळ्यात अश्रू https://t.co/mWICx2HsXq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021