सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शनिवारी करोना स्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते करण मेहेत्रे यांच्या अंत्यविधीला उसळलेली गर्दी आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने केलेला कंटेनमेंट झोन यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना लक्ष्य केले. यात पालकमंत्र्यांची पंचाईत झाली. त्यात इंदापूर पाणी प्रश्नावर बोलताना तर बोलणे टाळत थेट पत्रकार परिषदेतून पालकमंत्री उठले.
सोलापूरकरांनी इंदापूरची खोडी काढलीय, आता आम्ही नाही गप्प बसणार, इंदापूर – बारामती रस्त्यावर काळ्या पट्ट्या बांधून रस्ता रोकोhttps://t.co/HeqkNgYv1H
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
करण म्हेत्रे अंत्ययात्रा गर्दी प्रकरणात राजकीय दबावाखाली पोलिस प्रशासन नागरिकांवर कारवाई करत असल्याचा थेट आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे, त्याचबरोबर इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे यावर इंदापूरच्या नागरिकांना काय आवाहन कराल, असा प्रश्न विचारताच भरणे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर बोलणे टाळत थेट पत्रकार परिषदेतून ते उठले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर बोलणे टाळत थेट पत्रकार परिषदेतून ते उठले आणि इंदापूरच्या पाणीप्रश्नावर त्यांचे तोंड पडलेले दिसून आले.
लष्कर विभागातील सामाजिक आणि काँग्रेसचृ कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११ च्या दरम्यान निघाली होती. करण म्हेत्रे यांच्या प्रेमापोटी या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यादरम्यान पोलीसांनी नागरीकांना अंत्ययात्रेत जाण्यास रोखल्यामुळे नागरीक व पोलीस प्रशासनामध्ये किरकोळ वाद झाला. या अंत्ययात्रेतील फोटा व व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्या दिवशी संध्याकाळी सुमारे ८ च्या दरम्यान पोलीस प्रशासनांनी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या सुमारे २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल केला.
औरंगाबादेत दहा दिवसात 220 लहान मुलांना कोरोनाची लागण #coronavirus #positive #child #surajyadigital #औरंगाबाद #10days #सुराज्यडिजिटल #ourangabaad pic.twitter.com/HU48B5g5s3
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रत्येक्षात ८ ते १० नागरीकांसोबत वादावाद झाला असला तरी २०० ते २५० जणांवर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदविणे हे अन्याय कारक आहे, त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे व मोची समाजातील शिष्टमंडळ यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त यांची भेट घेवून सर्व परिस्थितीची माहिती दिली. तसेच ज्या ८ ते १० नागरिकांनी पोलीसांशी वादावाद केला होता. त्या नागरिकांची नावे पोलीस प्रशासनाला देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने दिले.
कोरोनाबाधित रुग्णांवर विनापरवाना उपचार विनित हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा, आर्युवेद शिक्षण आणि बोर्डावर अॅलोपॅथीची डिग्री
https://t.co/EPiB6pUFdC— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
परंतू निरपराध नागरिकांवर नोंद केलेला कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे) गुन्हा हा रद्द करून कलम १८८ अंतर्गत कारवाई करावी अशी विनंती केली. त्यावेळेस पोलीस आयुक्तांनी शहानिशा करून जे खरोखरच दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून निरपराध नागरिकांवरील गुन्हे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.
* अन्यायकारक कारवाई
संपूर्ण लष्कर परिसर, बेडरपूल, लोधी गल्ली येथील रस्ते संपूर्णपणे बंद करून नागरीकांच्या घरामध्ये घुसून दिसेल त्या युवकांना कोरोना टेस्ट करण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून त्यांच्यावर अन्यायकारक रितीने अटकेची कारवाई केली. त्यामध्ये ५० जणांना अटक केली. त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सर्व ५० जणांना जामीन मंजूर केला. तसेच या संपूर्ण परिसरातील रहदारीचे रस्ते बंद करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले.
* पोलिस आयुक्तांचा निषेध
पोलीस आयुक्त कारवाई करीत आहेत ती वैयक्तिक आकसापोटी किंवा कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी करीत आहेत असा संशय निर्माण होत असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करून सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा निषेध केला आहे. तसेच हि जर कारवाई स्थगित केली नाही तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, अखेर मान्सून आला https://t.co/CQRpIYPAU4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021