मुंबई / नागपूर : सुपरहिट ‘मैने प्यार किया’चे संगीतकार ‘राम-लक्ष्मण’ यांचं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. काही महिन्यांपासून ते दीर्घ आजारानं त्रस्त होते. २१ मे ला रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. राम-लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील होतं. ‘पांडू हवालदार’ या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक हिंदी सिनेमांना संगीत दिलं. ‘मैने प्यार किया’ सिनेमा साठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.
मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना तातडीचा आदेश अशा प्रकारचा उल्लेख तात्काळ हटवा #surajyadigital #Modi #Sarkar #मोदी #socalmedia #socal #media #सोशलमीडिया #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0qwyXWzEvQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
आज शनिवारी दुरापी १२ वाजता त्यांच्या प्रार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुलाकडे नागपूरमध्येच राहत होते. राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.
Mujhe abhi pata chala ki bahut guni aur lokpriya sangeetkar Ram Laxman ji (Vijay Patil) ji ka swargwas hua. Ye sunke mujhe bahut dukh hua. Wo bahut acche insaan the.Maine unke kai gaane gaaye jo bahut lokpriya hue. Main unko vinamra shraddhanjali arpan karti hun. pic.twitter.com/CAqcVTZ8jT
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 22, 2021
* या सिनेमांना दिलं संगीत
पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.
Good night friends with paying tribute to music director with one of my favourite compositions by #RamLaxman https://t.co/3aGKODooPX
— Shankar Jaikishan : The Maestro of the Millennium (@SJFansAssnCal) May 22, 2021
* राम-लक्ष्मण नावामागची गोष्ट
जेव्हा विजय पाटील मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले.
R.I.P. #RamLaxman…
Favorite song:https://t.co/Qjq2qcaYUO@narendramodi @RahulGandhi @priyankagandhi @salkhanacademy @bhagyashree123 @rajshri #bollywoodsongs #India #1 🇮🇳😭😢(courtesy of) @MadhuriDixit https://t.co/SAgD0Udh5p pic.twitter.com/ZLVUIpui9v
— Shyamal Suhana Chandra श्यामल चंद्र / CS GM / Ⓥ (@shyamal_chandra) May 22, 2021