मुंबई : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचा पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, डॉक्टरांच्या अक्षम्य चुकीमुळे सातव यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आता काँग्रेस समर्थकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर केलेले उपचार आणि त्यांच्या संशयास्पद मृत्यूची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे करण्यात आली आहे.
" आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय" https://t.co/HKY6ps1h4b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
बहिणीच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी रुग्णालयाने 25 हजार मागितले https://t.co/8xQXNwsPSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे अर्धापूर तहसीलदारांमार्फत निवेदन देवून केली आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली होती.
मात्र, डाॅक्टरांच्या अक्षम्य चुकीमुळे सातव यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आता नांदेडवासींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर केलेले उपचार आणि त्यांच्या संशयास्पद मृत्यूची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी अर्धापूर (जि. नांदेड) शहरातील वतीने देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे.
कोरोना उपचारासाठी गेले पुण्याला, वेळापुरात साडेतेरा लाखांची रोकड चोरीला
https://t.co/XABgCTq4ao— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील ओबीसीचे मोठे नेतृत्व -दिवंगत खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे येथे जहांगीर रुग्णालयात २३ एप्रिल २०२१ पासून उपचार सुरू होते. या दरम्यान गेल्या २२ दिवसापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याबाबत बातम्या येत असताना १६ मे २०२१ रोजी सकाळी त्यांच्या मृत्यूची अचानक बातमी कळाली व समस्त बहूजन ओ.बी.सी. समाजाला धक्काच बसला. राजीव सातव हे देशातील बहूजनाचे ओबीसी, एससी आणि एसटी समाजाचे राष्ट्रीय नेते होते.
सोलापुरात 132 म्युकर मायकोसिस रुग्ण, 30 जणांनी केली मात, आठ मृत्यू https://t.co/YvFqIwfJnr
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
त्यांनी ओबीसी बहूजन समाजाच्या प्रश्नावर व त्यांच्या आरक्षणा संदर्भात संसदेत हजारो प्रश्न विचारले होते. ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, सर्वोच्च पदावर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील सदस्याला आरक्षण देण्यात यावे. यासाठी ते संघर्ष करीत होते. तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावे. यासाठी त्यांनी संसदेत जोरदार मागणी केली होती.
अशा प्रकारे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या एका सुसंस्कारित, बुध्दीमान, हूशार आणि अभ्यासू बहूजन ओबीसी नेत्याचा अगदी तरुण वयात संशयास्पद मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना हायर डोस दिल्यामुळे त्यांचे फुफुस फाटले. अशा बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आहेत.
'म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून शरीरात जातो' https://t.co/Q2qgKhmUSD
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
त्यामुळे ओबीसी समाजाच्या राष्ट्रीय नेत्याच्या संशायस्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी भारत सरकारने उच्च स्तरिय समिती गठीत करून या समीतीमार्फत स्वर्गीय राजीव सातव यांच्या मृत्यूपूर्वी केलेले तपासणी अहवाल, त्यांच्यावर केलेले औषधोपचार आणि त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अर्धापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली आहे.