नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच आहे. जवळपास सहा महिन्यांपासून हे आंदोलन सुरु आहे. त्यातच आता २६ मे रोजी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याने देशव्यापी आंदोलनाची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली. याला १२ विरोधी पक्षांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा सुरू करावी अशी मागणी यात केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन,आठवड्यापूर्वीच झाले होते पत्नीचे निधन https://t.co/OH2H25Bu9L
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घ्यावे, या प्रमुख मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना कोरोना संकटाच्या काळात भरघोस मदत करावी. स्वामीनाथन आयोगाच्या सूचना, किमान आधारभूत किंमत कायदा तयार करावा, अशा काही मागण्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठेवण्यात आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनीच्या पाण्यावरुन शासनाची बनवाबनवी!, २२ गावांतील शेतक-यांच्या आंदोलनात मध्यस्थी करणारे अधिकारीच शासन नियुक्त समितीचे अध्यक्ष https://t.co/cJixMYpVQv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांना गेल्या अनेक दिवसांपासून विरोध करण्यात येत आहे. दिल्लीतील सीमांवर आंदोलक शेतकरी अजूनही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता ६ महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. समर्थन पत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ५ विद्यमान मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे.
Farmers are coming back to Delhi for 26th may protest, organised to mark 6 months of the agitation against the three pro-corporate farm laws #Modi_Nahi_Kisan_Jitega pic.twitter.com/385aiJjJkP
— Avtar Singh (@AvtarSi58290439) May 24, 2021
गेल्या ६ महिनांपासून देशभरातील विविध राज्यांमधील शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किमान ४० संघटनांचा संघ असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या दिवशी देशभरात ‘काळा दिवस’ पाळला जाणार आहे आणि संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला १२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
12 opposition parties extend their support to Samyukta Kisan Morcha (SKM) call to observe a countrywide protest day on May 26 marking the completion of six months of farmers protest against new farm laws. pic.twitter.com/YY70OpBU2a
— ANI (@ANI) May 23, 2021
* १२ पक्षांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध
देशभरातील १२ विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत देशव्यापी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या समर्थन पत्रावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांसारख्या बड्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ऑलंपिक मेडल विजेता सुशील कुमारला अखेर अटक, ६ वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगढ केंद्रशासित प्रदेशाची सीमा ओलांडली
https://t.co/Bxr7TWVUO4— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021