नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी एलोपॅथी ही मूर्ख आणि लंगडे विज्ञान असल्याचे म्हटले होते. यावर बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्र लिहून कोणत्याही मुद्द्यावर काळ-वेळ, आजूबाजूची परिस्थिती काय आहे हे पाहून बोलत चला असा सल्ला दिला आहे. एलोपॅथी उपचाराबद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे. तुमच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांपासून देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत.
पुणे : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता #pune #पुणे #surajyadigital #सुराज्यडिजिटल #पाऊस #rain #शक्यता pic.twitter.com/lKbYpJ6H44
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
कोव्हिड-19 साथरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमागचे कारण अॅलोपॅथी असल्याचा दावा योग गुरू बाबा रामदेव यांनी सार्वजनिकरित्या केला आहे. तसेच, “जेवढ्या लोकांचा मृत्यू रुग्णालयांमध्ये न गेल्यामुळं आणि ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, त्याहून अधिक मृत्यू अॅलोपॅथी औषधांचं सेवन केल्यामुळं झाला आहे”, असा दावा देखील बाबा रामदेव यांनी केला आहे. बाबा रामदेव यांच्या या अॅलोपॅथीविरोधी विधानावर आयएमएने आक्षेप नोंदवला आहे आणि त्यांच्यावर साथरोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
कोरोना टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/3y3DeeGDvZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
योग गुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आएमएच्या वाढत्या दबावानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याप्रकरणात हस्तक्षेप केला आहे. बाबा रामदेव यांना आपलं वक्तव्य मागे घ्यावे, असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन सांगितलं आहे. ‘एनडीटीव्ही’ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
शेतकऱ्यांचं २६ तारखेला देशव्यापी आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच, १२ पक्षांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करीत दिला पाठिंबा https://t.co/lpxxV4QNaR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
योग गुरु बाबा रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आएमएने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवार बाबा रामदेव यांना पत्र लिहून आपले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे. “बाब रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळं देशातील नागरिक दु:खी झाले आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोरोना विरुद्ध लढ्यात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या डॉक्टरांचा अनादर करणारे आणि दुर्दैव आहे. मी त्यांना याआधीच फोनवरुन याबाबत सांगितलं आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे रुग्णांसाठी देवासमान आहेत. कोरोनाच्या भयंकर स्थितीत ते पुढे येऊन काम करत आहेत”, असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन,आठवड्यापूर्वीच झाले होते पत्नीचे निधन https://t.co/OH2H25Bu9L
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते की, “भारत कोव्हिड-19 या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. आधुनिक उपचार पद्धती व भारत सरकार मिळून लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. या संघर्षात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या 1200 अॅलोपॅथी डॉक्टरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. बाबा रामदेव यांचा व्हिडिओ केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताना आयएमएने म्हटले की, यात योग गुरू म्हणत आहेत की, “ॲलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळखोर विज्ञान आहे.
IMA HQs Press Release on 22.05.2021 pic.twitter.com/rrc1LXA24n
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) May 22, 2021
आयएमएने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की, “हे सर्वज्ञात आहे की, योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण आजारी असतात तेव्हा ते आधुनिक वैद्यकीय सुविधा घेतात आणि अॅलोपॅथी औषधी खातात. मात्र, बाबा रामदेव हे निराधार आरोप करत आहेत आणि आपल्या बेकायदेशीर आणि मंजूरी नसलेल्या औषधी विकण्यासाठी लोकांची दिशाभूल करत आहेत”.
ऑलंपिक मेडल विजेता सुशील कुमारला अखेर अटक, ६ वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगढ केंद्रशासित प्रदेशाची सीमा ओलांडली
https://t.co/Bxr7TWVUO4— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021