धुळे : धुळेमधील दोंडाईचा येथून काही अंतरावर असलेल्या रामी गावातील एका शेतात नांगरणी करताना चार मुखी धातूचे जैन मंदिर आढळून आले आहे. हे मंदिर ११ इंच उंचीचे आहे. त्याचे वजन ४ किलो २५० ग्रॅम एवढे आहे. या मंदिरावर जैन भगवंताच्या ४ मोठ्या व लहान ४८ अशा एकूण ५२ मूर्तीचे कोरीव काम केलेले आहे. शेतजमिनीत सापडलेले हे मंदिर दोंडाईचा पोलिसात जमा केले असून याची ची माहिती मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांनी दिली.
कोरोना टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/3y3DeeGDvZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
रामी गावातील एका शेतात ट्रॅक्टरने नांगरणी व बैलजोडीने वखरणी करीत असताना जमिनीत धातूचे, चार मुखी, ११ इंच उंचीचे पुरातन जैन मंदिर आढळून आले. महसूल विभागाने याचा पंचनामा करून ते मंदिर पोलिसांकडे हस्तांतरित केले. याची माहिती नाशिकच्या पुरातन विभागालाही देण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रामी गावालगत गंगाबाई रामभाऊ माळी यांची शेतजमीन आहे. शुक्रवारी त्यांचा भाचा दिगंबर गंगाराम माळी यांनी ट्रॅक्टरने नांगरणी व बैलजोडीने वखरणी केली. यावेळी त्यांना शेतजमिनीत धातूचे चारमुखी, ११ इंचचे छोटेसे जैन मंदिर आढळले. त्याचे वजन ४ किलो २५० ग्रॅम एवढे आहे. जैन मंदिराबाबत जाणकार डुंगरचंद जैन यांचाही जबाब घेतला आहे.
काळ – वेळ, परिस्थिती पाहून बोलत चला – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन https://t.co/mH3Mx0qS7A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
माळी यांनी ते जैन मंदिर गावातील महादेव मंदिराजवळ वडाच्या झाडाजवळ ठेवून दिले. शनिवारी (ता.२२) तेथील पुजाऱ्यास जैन मंदिर दिसल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील श्रीकांत वाघ यांना याची माहिती दिली. रविवारी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पोलीस पाटील श्रीकांत वाघ यांनी महादेव मंदिर व शेतजमिनीत जाऊन चौकशी करून पंचनामा केला.
शेतकऱ्यांचं २६ तारखेला देशव्यापी आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच, १२ पक्षांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करीत दिला पाठिंबा https://t.co/lpxxV4QNaR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021