मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 जूननंतर वाढणार की संपणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं. ‘राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच ते सहा दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल’, असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांचं २६ तारखेला देशव्यापी आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच, १२ पक्षांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करीत दिला पाठिंबा https://t.co/lpxxV4QNaR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
कोरोनाची तिसरी लाट आणि ब्लॅक फंगसचं थैमान यामुळे महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आता त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरु असल्या तर काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोन जिल्ह्यांमध्ये सरसकट शिथीलता आणता येणार नाही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवारांनी विविध विषयावर भाष्य केलं.
रेड झोनमधील जिल्हे बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्य लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काळ – वेळ, परिस्थिती पाहून बोलत चला – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन https://t.co/mH3Mx0qS7A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात आता कोरोना रुग्ण कमी होत आहेत. लॉक डाऊन शिथील करण्याची मागणी होत आहे. पुढच्या पाच सहा दिवसात परिस्थिती बघून निर्णय होईल. माझ्या माहितीप्रमाणे 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे सरसकट शिथील करता येणार नाही. काही झोन करता येतील. कंटेन्मेंट झोन करून तिथे नियम कडक करावे लागतील. जिथं रुग्ण संख्या कमी तिथे शिथील करावे लागेल”
जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत तिथे कडक लॉकडाऊन असला पाहिजे. गृह विलगिकरणाला अर्थ नाही लोकांना संस्थात्मक विलगीकरण केलं पाहिजे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोना बाधित होत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दोंडाईचामध्ये शेतात आढळले ११ इंची धातूचे जैन मंदिर https://t.co/Njdbn298Hh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात काही रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.