पुणे : मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता भाजपने मोठी घोषणा केली. ‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. कोणताही नेता वा संघटना मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन करणार असेल तर भाजप त्यात पक्षाचा बॅनर, झेंडा, बिल्ला न वापरता सहभागी होईल. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी असे सर्वजण त्यात सहभागी होतील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वात, कुठल्याही नावाने केल्या जाणाऱ्या आंदोलनात आम्ही विदाउट बॅनर, विदाऊट झेंडा, विदाउट बॅच नागरिक म्हणून सहभागी होऊ. pic.twitter.com/MFTj17pwak
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 24, 2021
दोंडाईचामध्ये शेतात आढळले ११ इंची धातूचे जैन मंदिर https://t.co/Njdbn298Hh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालायने राज्याचा मराठा आरक्षण कायदा रद्द केला. यानंतर संयमाची भूमिका घेणारे नेते आता आक्रमक होत आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपने मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा, बॅनर न घेता मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होती, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मांडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या प्रमाणे सवलती दिल्या, तशा सवलती आघाडी सरकारने मराठा समाजाला द्याव्यात, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात सोलापूरसह 14 जिल्ह्यांतील लॉकडाऊन वाढणार https://t.co/es598EEATJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, भाजपने तसं पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. कोणाताही नेता किंवा संघटना मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन करणार असेल तर भाजप त्यात पक्षाचा बॅनर, झेंडा, बिल्ला न वापरता सहभागी होतील. तसेच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे देखील त्यामध्ये सहभागी होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय स्वरुप येऊ नये यासाठी भाजप पक्षाचा झेंडा वापरणार नाही. सर्व सकारात्मक आणि अहिंसात्मक आंदोलनात भाजप सहभागी होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काळ – वेळ, परिस्थिती पाहून बोलत चला – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन https://t.co/mH3Mx0qS7A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021