नवी दिल्ली : फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध मिल्खा सिंग बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते घरीच उपचार घेत होते. मात्र, काल त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना रुग्णालयात थांबावं लागणार आहे.
"जे स्वतःला वाचवू शकले नाही ते कसले डॉक्टर", रामदेवबाबांचा आणखीन एक व्हिडीओ आला समोरhttps://t.co/6VxSlwMmEo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा किताब दिला होता. आशियाई खेळांमध्ये त्यांनी ४ तर राष्ट्रकूल स्पर्धेत एक सुवर्णपद जिंकले आहे.
भारत देशात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत कोणीही या महामीराच्या तावडीतून सुटलेले नाही.
'लसीचे पैसे आमचे सरकार देत आहेत मग आम्ही फोटो का लावू नये' https://t.co/IcECAs4I8t
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नुकतीच भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनाही चंदीगडमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले होते. परंतु काल सोमवारी ( २४ मे) त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
जीव आपले वडील मिल्खा सिंग कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शनिवारी दुबईवरुन घरी परतले आहेत. पीटीआयशी बोलताना जीव म्हणाले की, “मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फ्लाइंग सिख म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला. ते सध्या 91 वर्षांचे आहेत. मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या चंडीगड इथं गृह विलगीकरणात आहेत. #MilkhaSingh #covidpositive pic.twitter.com/DkA7nAt15B
— AIR News Pune (@airnews_pune) May 21, 2021
त्यांना घरी अशक्तपणा जाणवत होता. कालपासून त्यांनी जेवणही करणे कमी केले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. असे असले तरीही, त्यांची तब्येत ठीक दिसत आहे. परंतु आम्हाला वाटले की, त्यांना घरी ठेवण्यापेक्षा रुग्णालयात दाखल करणे अधिक सुरक्षित ठरेल. तिथे ते अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील.”
'यास चक्रीवादळ' घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार https://t.co/OVmX2g6GpV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
* दोन नोकरांनाही कोरोनाची बाधा
मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या घरातील २ नोकरांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. सुखद बाब म्हणजे, त्यांची पत्नी निर्मला मिल्खा सिंग, सून कुदरत आणि नातू हरजय मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.
मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जीव यांनी सांगितले आहे.