नवी दिल्ली / मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन https://t.co/JJSd0q749t
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असतानाच आता म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (ब्लॅक फंगस) या आजारानेही डोकं वर काढलं आहे. राज्यात म्युकरकायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यात अनेक रुग्ण दगावत आहेत. अशावेळी राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. कोरोना साथरोगावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका दाखल आहे.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला https://t.co/sBigiW6Nqx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने म्युकरमायकोसिसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिस या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला असल्याची माहिती दिली होती. तसंच या रुग्णांवरील उपचारासाठी आणि औषधांसाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
* ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगस
ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.
राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असल्यास लगेच राजीनामा, राज्यभर दौरा, …यामुळे भाजपाच्या सुभाष देशमुखांकडे दाखवले बोट https://t.co/bbii2UtIhW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
* नागपूरमध्ये म्यूकर मायकोसिसचे एकूण 1086 रुग्ण
नागपुरात कोरोनानंतर म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस नवे 24 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 963 झाली आहे. त्यामुळं विभागातील म्युकरग्रस्तांची संख्या आता संख्या 1 हजार 86 वर गेलीय. गोंदिया जिल्ह्यात रविवारी एकाचा म्युकरमुळे मृत्यू झाला. तर नागपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे म्युकर मायकोसिसचे नागपूर विभागात आतापर्यंत 52 मृत्यू झाले आहेत.
भोला 'पडोसन'!, सुनिल दत्त यांचा स्मृतीदिन (ब्लॉग)https://t.co/U7OfTD8G7u
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021