मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजलाय. कडक निर्बंध लादले असले तरी १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली.
जप्त केलेल्या वाहनांची होणार सुटका; कागपत्रे, दंड भरून घेऊन जा आपले वाहन https://t.co/yuN2keJZMU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
या बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये करोनाचा धोका जरी कमी झाला असला तरी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अद्यापही वाढत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पोलीस महासंचालक संजय पाण्डेय, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आयुक्त रामास्वामी एन, जे. जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
गाईला मिठी मारल्याने मिळतेय मानसिक शांती; अमेरिकन लोकांनी शोधला उपाय https://t.co/BMa6B13u7a
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाबाधित रुग्णांना होम आयसोलेशन न करता कोविड सेंटरमध्ये विलगीकरण करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आज राज्य सरकारने कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेल्या १८ जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांना उपचारासाठी कोविड सेंटरला जावे लागणार आहे.
शिवानंद पाटील नूतन सभागृहनेते, निवडणुकीच्या तोंडावर बदल https://t.co/SLWLPLM9ug
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
जिल्ह्यांमधील करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशनची प्रक्रिया बंद असणार आहे. येथे कोरोना रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला घरी उपचार घेता येणार नाही आहेत, त्या रुग्णांला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसला चाहता, वडिलांवर केले चाकूने वार https://t.co/PLfpm7QL5C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021