नवी दिल्ली : कर्नाटकमधील एका भाजपा आमदाराने कोरोनाला पळवून लावण्यासाठी होमहवन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यज्ञकुंड एका ट्रॉलीत ठेवून संपूर्ण शहरात देखील फिरवलं आहे. बेळगावमध्ये ही घटना घडली. कोरोनापासून शहराची सुटका व्हावी म्हणून हे करत असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी कोरोनामुळे आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण बेळगावमधील भाजपा आमदार अभय पाटील यांच्या वतीने हवन करण्याचं आयोजन करण्यात आलं.
फेसबूक, ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? केंद्र सरकारच्या कारवाईकडे लक्ष https://t.co/eAMvCbhoSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
काही राजकीय पक्षाचे नेते हे कोरोनासंदर्भात वादग्रस्त विधानं करत आहेत. तसेच अजब उपाय सांगून कोरोनाला पळवून लावा, असा दावा देखील करत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी एका आमदाराने होम-हवन केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
कर्नाटकमधील एका भाजपा आमदादाराने कोरोनाला पळवून लावण्यासाठी होम-हवन केले. तसेच ते यज्ञकुंड एका ट्रॉलीमध्ये ठेवून संपूर्ण शहरात देखील फिरवलं आहे. बेळगावमध्ये ही घटना घडली आहे. ज्या परिसरात आमदारांना पोहचणं शक्य झालं नाही. तेथे त्यांनी वेगळं होमहवन करण्याचं आयोजन केलं. कोरोनापासून शहराची सुटका व्हावी म्हणून हे करत असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी कोरोनामुळे आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू झाला आहे.
मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन https://t.co/eD9F6WYfEY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दक्षिण बेळगावमधील भाजपा आमदार अभय पाटील यांच्या वतीने कोरोनाला पळवून लावण्यासाठी विशेष हवन केले.
* शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो
अभय पाटील यांनी यज्ञ आणि हवन यांच्यामुळे वातावरणाचं शुद्धीकरण होतं. वैज्ञानिक दृष्ट्यादेखील ही बाब सिद्ध झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत येथे सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच त्यामुळेच प्रत्येक घरासमोर हवन करण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये शंखनाद आणि होम-हवनाच्या धुरांमुळे कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्याची तयारी केली गेली होती. भाजपाचे नेते गोपाल शर्मा यांनी कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला होता.
मोदी सरकार लवकरच करणार मोठी घोषणा ? होईल पॅकेजची घोषणा https://t.co/PDKsEm6hKP
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो, असे म्हटलं होतं. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला असून तो जोरदार व्हायरल झाला होता.
कोरोना संकट : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मोठा आदेश, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर https://t.co/DhTWz54LlL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
* वातावरणातील हवा शुद्ध होते
गोपाल शर्मा हे या व्हिडीओमध्ये सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले होते. यज्ञामध्ये गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर हे सगळं एकत्र करून हवन पेटवण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली होती. यज्ञ कुंडातील धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि धोकादायक व्हायरस नष्ट होतो. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढते असा दावाही गोपाल शर्मा यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी देखील गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचा दावा केला होता.
शंभरी गाठली…
पेट्रोलने एकदाची शंभरी गाठली, याच्यापुढेही जावू शकते का? आपणास काय वाटते #fuelpump #surajyadigital #fuel #fuelprise #इंधन #शंभरी #सुराज्यडिजिटल #Rs100 pic.twitter.com/ce33cMH5Zz— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021