पुणे : लेखक, पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेखन केलं आहे. यानंतर पुणे भाजप युवा मोर्चाचे महेश पवळे यांच्या तक्रारीनंतर वारजे पोलीस ठाण्यात कुबेरांवर गुन्हा दाखल झाला आहे. इतिहासकारांनी खरी माहिती समोर आणल्यानंतर कुबेरांनी खोटी माहिती का छापली. याची चौकशी झाली पाहिजे, असं पवळे तक्रारी नंतर म्हणाले.
कोरोना : यंदातरी आषाढी पायीवारी होणार का? उद्या महत्त्वाची बैठक https://t.co/HakYc4P6xJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित पुस्तकात महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल अत्यंत चुकीची, निराधार व बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिला आहे.
महाराष्ट्र – या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पावसाची हजेरी, तीन दिवस पावसाची शक्यता
https://t.co/9HQctMmQZp— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
खासदार संभाजीराजे भोसले यांनीही लेखी निषेध केलाय. गिरीश कुबेर यांच्या “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले.
सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध केला.
छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. काहितरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी, किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या प्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोक करत असतात ; यापैकीच एक हे असावेत.
“रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत. सरकारने या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरीत करावी, असे प्रकाशकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. त्यांच्या या पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याचे दुुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केलं होतं. त्यामुळे गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता पुण्यात भाजपने गिरिश कुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बापरे ! अधिकाऱ्याच्या घरात सापडले मोठे घबाड; 3.40 कोटी रुपये जप्त https://t.co/BRLfswI29S
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
कुबेर यांचे ‘रेनिसन्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यात छत्रपती संभाजी महाराज, राणी सोयराबाई यांची बदनामी झाल्याने पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. अशाच प्रकारचे अर्ज अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आले आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
काँग्रेस आमदाराला अश्लील व्हिडिओ कॉल, ब्लॅकमेलनंतर प्रकरण उजेडात https://t.co/dLrldbgUCV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021