मुंबई : पुन्हा 9 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसात रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळ धडकले. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू शकतो, असे सांगण्यात आले आहे. तर पूर्व विदर्भात पुढील 24 तासात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
तरूण सरपंचानं करून दाखवलं; सोलापुरातलं 'गाव' कोरोनामुक्त केलं https://t.co/ZaOdIkY2JA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
मुंबई आणि परिसर वगळता राज्याच्या अंतर्भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलक्या सरींची शक्यता आहे. मुंबईमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांमध्ये उकाड्याची तीव्रताही अधिक जाणवेल, अशीही शक्यता आहे. मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे.
शहरातील वडाळासह काही भागात आज सकाळी पाऊस झाला. गेल्या आठवड्यात तौक्ते चक्रीवादळात पावसाने मुंबईला झोडपले होते. दरम्यान सध्या देशात यास चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. पश्चिम बंगालमध्ये काल हे वादळ धडकले. त्यानंतर या वादळामुळे आजही ओडिशासह काही राज्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा https://t.co/KMN4QFaEbH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
मार्चपासून आत्तापर्यंत उन्हाळ्याच्या काळात राज्यभरातच सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. लातूर, अहमदनगर, अकोला, नंदुरबार, हिंगोली हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. सांगली, जालना, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये या आठवड्यातील पाऊस भर घालेल.
मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी #rain #surajyadigital #पाऊस #mumbai #हजेरी #सुराज्यडिजिटल #मुंबई pic.twitter.com/FwEv4oXwxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. तसेच यास चक्रीवादळाचाही राज्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. बुधवारी कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे याची व्याप्ती अधिक वाढेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
काँग्रेस आमदाराला अश्लील व्हिडिओ कॉल, ब्लॅकमेलनंतर प्रकरण उजेडात https://t.co/dLrldbgUCV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी इतर जिल्ह्यांसोबत अहमदनगर, पुणे येथेही पाऊस पडेल. त्याचसोबत विजा आणि 30 ते 40
किलोमीटर प्रति तास या वेगाने वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. मात्र अकोला, अमरवाती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना काही प्रमाणात अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट होऊ शकतो.
बापरे ! अधिकाऱ्याच्या घरात सापडले मोठे घबाड; 3.40 कोटी रुपये जप्त https://t.co/BRLfswI29S
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021