मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्याने समाज अस्वस्थ आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
बापरे ! अधिकाऱ्याच्या घरात सापडले मोठे घबाड; 3.40 कोटी रुपये जप्त https://t.co/BRLfswI29S
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
महाराष्ट्र – या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पावसाची हजेरी, तीन दिवस पावसाची शक्यता
https://t.co/9HQctMmQZp— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. ठरल्याप्रमाणे आज संभाजीराजे यांनी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.
राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे या भेटींकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.
वादग्रस्त पुस्तकावरून लेखक, पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल https://t.co/TdgtZ553bR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
मराठा समाजावर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर रस्तावर येत मोर्चा, आंदोलन करण्याची भाषा काही मराठा संघटना करत आहेत. त्याचवेळी न्यायालय लढाई सरकार पातळीवर लढली जाणार आहे. या सर्व गोष्टींवर पवार आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली.
कोरोना : यंदातरी आषाढी पायीवारी होणार का? उद्या महत्त्वाची बैठक https://t.co/HakYc4P6xJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021