सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ रुजावी यासाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या पाच जून, पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान राबवली जाणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची रोपे लावली जावीत. रोपांच्या वाढीची आणि संवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, प्रशासन अधिकारी, कुटुंबासाठी सोयhttps://t.co/tS1AmBz7YV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
वादग्रस्त पुस्तकावरून लेखक, पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल https://t.co/TdgtZ553bR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
सोळा लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात यंदा सुमारे सोळा लाख वृक्षारोपण केले जाणार आहे. यापैकी अकरा लाख रोपे वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावली जाणार आहेत. उर्वरित पाच लाख रुपये विविध विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लावली जाणार आहेत.
देशी, स्थानिक प्रजातींना प्राधान्य या रोपात सर्व देशी आणि स्थानिक प्रजाती निवडण्यात आल्या आहेत. कारण या प्रजाती ऑक्सिजन जास्त प्रमाणात सोडतात. त्याचबरोबर पक्षी इतर जीव आणि परिस्थितीला पोषक असतात, असे पाटील यांनी सांगितले.
कोरोना : यंदातरी आषाढी पायीवारी होणार का? उद्या महत्त्वाची बैठक https://t.co/HakYc4P6xJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनीतून पाणी पळवण्याचा आदेश रद्द, निघाला लेखी आदेश, सोलापूरच्या एकजुटीला यश https://t.co/NIAMeyFzr9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
रोपे देण्याची व्यवस्था वृक्षारोपण चळवळीत सहकारी संस्था, शिक्षण संस्था, औद्योगिक कंपन्या यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशा संस्थांनी शंभरपेक्षा अधिक वृक्षारोपण करण्याची तयारी दाखविल्यास या संस्थांना रोपे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थी आणि युवकांना कळावे, त्यांचा सहभाग वाढावा यासाठी निबंध, घोषवाक्य आणि माहिती परसबाग व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
"मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा" https://t.co/QevQLlYFpx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
सव्वीस रोपवाटिकांतून रोपे तयार केले जाणार आहे. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या 15 आणि वनविभागाच्या 11 रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमधून देशी आणि स्थानिक प्रजातीची रोपे तयार केली जाते. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी संध्याराणी बंडगर (9922937981) वन विभाग किंवा संजय भोईटे (9421584619), सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले.
रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी, विनम्र अभिवादन #पुण्यतिथी #रमाबाईआंबेडकर #अभिवादन #surajyadigital #विनम्र #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/Ex3LYfVDg9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021