मुंबई : भारतातील आणखी एका स्टारची एन्ट्री बॉलिवूडमध्ये होणार आहे. ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. सिनेमाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक्वेरी यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. एका चाहत्याने ट्वीटरवर क्रिस्टोफर यांना प्रश्न विचारला की भारतात सोशल मीडियावर मिशन इम्पॉसिबल 7 या मध्ये प्रभास दिसणार असल्याची चर्चा आहे. हे खरंय का? यावर उत्तर देत क्रिस्टोफर म्हणाले की, ‘प्रभास हा अतिशय टॅलेंटेड अभिनेता आहे. पण आम्ही भेटलो नाही.
फुगे बांधून कुत्र्याला हवेत उडवलं; युट्यूबरला अटक https://t.co/cGGzOoIi8z
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता प्रभास हॉलिवूडच्या टॉम क्रूजसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एका व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सर्वांचा लाडका ‘बाहुबली’ फेम प्रभास हॉलिवूडमध्ये जाणार आसल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
I gotta good feeling about this one… May be its true #Prabhas is in Mission Impossible 7..
Super excited 🥳🥳🥳🥳🥳 pic.twitter.com/t5uCwvRT2k— Radhe Shyam Prabhas Tamil Fans (@Princes48677134) May 25, 2021
परंतू प्रभास आणि ‘MI-7’चित्रपटाच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी पुढील म्हणजे ‘मिशन इम्पॉसिबलच्या सातव्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधला असल्याचं सांगितलं जात आहे. क्रिस्टोफर मॅकक्वेरी आणि प्रभासची ओळख ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनीतून पाणी पळवण्याचा आदेश रद्द, निघाला लेखी आदेश, सोलापूरच्या एकजुटीला यश https://t.co/NIAMeyFzr9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
मॅक्वॅरीने ‘बाहुबली’ अभिनेत्याला ही कथा सांगितली आणि त्याने त्यासाठी आपली संमती दिली असल्याचं समोर येत आहे. मिशन इम्पॉसिबल एक लोकप्रिय हेरगिरी अॅक्शन फिल्म असून चित्रपटाचा सातवा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये टॉम क्रूज शिवाय सायमन पेग, एलेक बाल्डविन, वॅनेसा किर्बी आणि रेबेका फर्ग्यूसन दिसणार आहेत.
रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी, विनम्र अभिवादन #पुण्यतिथी #रमाबाईआंबेडकर #अभिवादन #surajyadigital #विनम्र #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/Ex3LYfVDg9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
चर्चा खरी मानाल तर ‘मिशन इम्पॉसिबल’च्या दोन पार्टचे दिग्दर्शन केलेले दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी या फ्रेंचाइजीच्या 7 व्या पार्टसाठी प्रभासशी संपर्क साधला आहे. मॅकक्वेरी यांनी प्रभासला या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका देऊ केली आहे. क्रिस्टोफर मॅकक्वेरी आणि प्रभास यांच्यात चर्चा झाली. प्रभास ‘राधे-श्याम’ सिनेमासाठी इटलीत असताना ही भेट झाल्याचे कळतेय. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अभिनेता सलमान खानची दहशत बघा, कमाल आर खान घाबरला https://t.co/zRnY4bqL0c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
आता प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स ‘राधे-श्याम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले असून 30 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. साहजिकच या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे.
चारवेळा पंतप्रधानांनी भेट नाकारली, पूर्वी चाळीस वेळा भेट दिली, का सांगत नाहीत ? https://t.co/QNNOkO2Ljm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021