रांची : झारखंडच्या रांची येथील कांची नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला पूल यास चक्रीवादळाचा वेग झेलू शकला नाही. हाराडीह बुढाडीह पूल मध्यभागातून मोडून पडला. हा पूल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू या भागांना जोडत होता. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी ग्रामीण विकास विभागाच्या विशेष प्रमंडळाने 13 कोटी रुपये खर्चून हा ब्रिज बांधला होता. हा पूल 600 मीटर लांबीचा आहे.
मराठा आरक्षण – संभाजीराजे आक्रमक, सर्वात मोठी घोषणा, 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, 7 जूननंतर कोरोना बिरोना बघणार नाहीhttps://t.co/MdVEgKh0c9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
रांचीमध्ये कांची नदीवर करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला आहे. हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. हाराडीह-बुधाडीह पूल काल गुरुवारी (ता. 27) सायंकाळी साडेचारच्या सुमारास मधून तुटला आणि कोसळला. हा पुल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू यांना जोडत होता. हा 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्याने दोन्ही बाजूचे गावकरी पुलाच्या दोन्ही बाजुला अडकले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
छत्रपती खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण विषयावर लाईव्ह मुद्दे मांडताना #surajyadigital #MarathaReservation #सुराज्यडिजिटल #मराठाआरक्षण #sanbhajeraje #छत्रपतीसंभाजीमहाराज #छत्रपतीhttps://t.co/Yuzu3rv5HF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
तीन वर्षांपूर्वीच ग्रामविकास विभागाकडून 13 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता.
सॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या, सत्य लपवण्यासाठी नवऱ्याचं भयंकर कृत्य, शवविच्छेदन टाळण्यासाठी कोरोना पॉझिटिव्हचा खोटा अहवाल सादर
https://t.co/29MJT2j7D5— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी पूल कोसळल्याची बातमी मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पाहणी केली. ते म्हणाले कि, “यापूर्वी देखील असाच एक उच्चस्तरीय पूल कोसळला असून दोन्ही पुलांचे बांधकाम करणारी कंपनी एकच आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई करायला हवी. अवैध वाळू उत्खननामुळे यापूर्वी देखील दोन पूल कोसळले आहेत. आता हा तिसरा पूल कोसळला आहे.
* पुलाचा पाया कमजोर, ‘यास’ वादळाचा सामना करण्यात अपयशी
पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. पुलाचे खांब उभे करताना कोणतीही दखल न घेता ते खांब दलदलीत उभे केले होते, ज्यामुळे पुलाचा पाया कमजोर होता.
त्यातच हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच पूल कोसळण्याचे कारण नदीतून दररोज होणारे वाळूचे अवैध उत्खनन देखील असल्याचे सांगितले जात आहे. वाळू तस्कर पुलाच्या भोवती जेसीबी लावून वाळू उत्खनन करत असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ व्या जयंती… विनम्र अभिवादन…"ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा…" #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Savarkar #जयंती #अभिवादन #सावरकरhttps://t.co/Bpiop35QIX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021