बीड : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पूजा रायकर नावाच्या विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. लग्न झाल्यानंतर मुल होत नाही म्हणून पूजाचा छळ सुरू होता. अनेकदा मारहाण तसेच उपाशी ठेवणे या त्रासाला कंटाळून पूजाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. दरम्यान, हे लपवण्यासाठी पूजाच्या सासरच्यांनी तिला कोरोना झाल्याचे खोटे सर्टिफिकेट बनवले. मात्र शवविच्छेदनात सत्य समोर आले.
मराठा आरक्षण – संभाजीराजे आक्रमक, सर्वात मोठी घोषणा, 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, 7 जूननंतर कोरोना बिरोना बघणार नाहीhttps://t.co/MdVEgKh0c9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
पाटोदा तालुक्यातील धनगर जवळकामध्ये ही घटना घडली. पूजा गणेश रायकर (वय 21) असं मयत तरुणीचं नाव असून याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. अंबेजोगाईचे माहेर असलेल्या पूजाचा विवाह दोन वर्षापूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता. गणेश पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष चांगले गेले.
छत्रपती खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण विषयावर लाईव्ह मुद्दे मांडताना #surajyadigital #MarathaReservation #सुराज्यडिजिटल #मराठाआरक्षण #sanbhajeraje #छत्रपतीसंभाजीमहाराज #छत्रपतीhttps://t.co/Yuzu3rv5HF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर अद्याप मुलबाळ होत नाही यावरून तिचा नवरा गणेश, सासरे शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला त्रास देऊ लागले. त्यात कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादाही लावण्यात आल्याचे समोर आले आहे. पूजाने माहेरच्यां व्यक्तींना याबाबत सांगितलं होतं. मात्र पूजाच्या आई- वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. शिवाय त्यांच्या आणखी एका मुलीचे लग्न बाकी होते. त्यामुळे जमले तर पैसे देतो असं पूजाच्या सासरच्यांना सांगितलं होतं.
सोलापुरात ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण, १० तालुक्यातील १३७ हॉट स्पॉट गावांची यादी https://t.co/KCGV5EdTDo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
* शवविच्छेदन टाळण्यासाठी कोरोना पॉझिटिव्हचा खोटा अहवाल सादर
हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पूजाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा बनावट अहवाल बनवण्यात आला. पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड होईल हे लक्षात येऊ नये, तसेच नियमानुसार कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करत नाहीत त्यामुळे शवविच्छेदन टाळण्यासाठी लॅबमध्ये पुजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल सादर केला. परंतु पूजाच्या माहेरच्या लोकांना संशय आला त्यांनी दुसरीकडे पुजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी चक्क तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आणि मग पूजाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
* सहा दिवस उपचार घेऊन पुण्यात मृत्यू
एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका याठिकाणी गावी परतला होता. तिथे आल्यावर पूजाला मारहाण करण्याचा प्रकार वाढला होता. त्याने आई वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाला मारहाण, शिवीगाळ करून तिचा सतत छळ सुरू ठेवला. अनेकदा तिला ते उपाशीही ठेवत होते. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने 19 मे दुपारी तीन वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायझर प्राशन केले. काही वेळानंतर तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सहा दिवस उपचार घेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले . त्या ठिकाणी 26 मे रोजी पहाटे 4 वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
'पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा' https://t.co/lywcS7ErJ6
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
* बोगस अहवाल आणून देणारा भाऊ फरार
पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरे शिवाजी, सासू विजुबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे याच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे. कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ फरार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ व्या जयंती… विनम्र अभिवादन…"ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा…" #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Savarkar #जयंती #अभिवादन #सावरकरhttps://t.co/Bpiop35QIX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021