वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर असलेल्या वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी तर एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि. २८ मे ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ व्या जयंती… विनम्र अभिवादन…"ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा…" #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Savarkar #जयंती #अभिवादन #सावरकरhttps://t.co/Bpiop35QIX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
सोलापुरात ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण, १० तालुक्यातील १३७ हॉट स्पॉट गावांची यादी https://t.co/KCGV5EdTDo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
यात वेळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कॉन्टबेल विठ्ठल बंदुके, पोलीस हे गंभीर जखमी आहेत, तर पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हातभट्टी दारुची रेड टाकायला गेलेल्या वेळापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके व पोहेकॉ दीपक मेहेरकर यांच्यावर वेळापूर पारधेवस्ती येथे प्राणघातक हल्ला झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या, सत्य लपवण्यासाठी नवऱ्याचं भयंकर कृत्य, शवविच्छेदन टाळण्यासाठी कोरोना पॉझिटिव्हचा खोटा अहवाल सादर
https://t.co/29MJT2j7D5— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
वेळापूर येथील पालखी चौक येथून पुणे रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ऐश्वर्याच्या पाठीमागे काही अंतरावर असलेल्या पारधी वस्ती येथे पोलीस अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यावर कारवाई गेले. यावेळी अचानक पारधी वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला.
यावेळी तातडीने वेळापूर पोलीस ठाणे येथून अतिरिक्त कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी जखमींना वेळापूर येथील माने देशमुख हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे.
सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध #bed #Available #solapur #Kovid #रुग्ण #सोलापूर pic.twitter.com/zLfjllyVR3
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
वेळापूर पोलीस ठाणे अंतर्गत १६ गावे येतात यामध्ये सध्या कोरोनामुळे अतिरिक्त कामांचा भार पोलिसांवर आहे. वेळापूर येथे सध्या अपुरे कर्मचारी असून त्यांच्यावर कामाचा भार पडत आहे.
घटनास्थळी अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच त्यांनी वेळापूर येथील माने देशमुख हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी पोनि भगवान खारतोडे, चालक पोकॉ विठ्ठल बंदुके व पोहेकॉ दीपक मेहेरकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान सदर प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
13 कोटी खर्चून बांधलेला पूल पहिल्याच पावसात मोडून पडला, पुलाचा पाया कमजोर, 'यास' वादळाचा सामना करण्यात अपयशीhttps://t.co/qPFK2GedQm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021