उल्हासनगर : उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना काल शुक्रवारी (ता.28) रात्री 9 च्या सुमारास घडली.
नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्याअसून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
एनडीआरएफ, टीडीआरएफ टीम तसेच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तातडीने घटना स्थळी दाखल होत युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढण्याचे आदेश यावेळी दिले. pic.twitter.com/slCXJLuZh8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2021
पुनीत बजोमल चांदवाणी (वय 17 वर्ष), दिनेश बजोमल चांदवाणी (वय 40 वर्ष), दीपक बजोमल चांदवाणी (वय 42 वर्ष), मोहिनी बजोमल चांदवाणी (वय 65 वर्ष), कृष्णा इनूचंद बजाज (वय 24 वर्ष), अमृता इनूचंद बजाज (वय 54 वर्ष), लवली बजाज (वय 20 वर्ष) असे सात मृतांची नावे आहेत. अलगोत नायडर ( पु/ वय 60 वर्ष) हा गंभीर जखमी आहे.
13 कोटी खर्चून बांधलेला पूल पहिल्याच पावसात मोडून पडला, पुलाचा पाया कमजोर, 'यास' वादळाचा सामना करण्यात अपयशीhttps://t.co/qPFK2GedQm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसंच अशा धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याचा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहे. परंतु या घटनामुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादयक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दारु अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, वेळापुरातील पारधी वस्तीतील घटना
https://t.co/5MCyT44Uow— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट होते. स्लॅब कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे काही रहिवाशांनी बाहेर पळ काढला तर काहींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. या पथकांनी ढिगारा बाजूला करुन सात मृतदेह बाहेर काढले.
नेहरू चौक, उल्हासनगर येथील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा पाचव्या मजल्या पासून पहिल्या मजल्या पर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचत सुरु असलेल्या मदत आणि बचाव कार्याची पाहणी केली. pic.twitter.com/d9cuvvcszA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2021
* गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू
गेल्याच आठवड्यात मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यात देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. 1994 -95 मध्ये बांधलेल्या काही धोकादायक इमारतीमधील स्लॅब पालिकेने कारवाई करत तोडले होते. मात्र संबंधित बिल्डरने हेच स्लॅब वेल्डिंग करत परत जोडले त्यामुळे या दुर्घटना होत आहेत. त्यामुळे अशा इमारती शोधून त्या रिकाम्या कराव्यात तसेच अशा इमारती बांधणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
सॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या, सत्य लपवण्यासाठी नवऱ्याचं भयंकर कृत्य, शवविच्छेदन टाळण्यासाठी कोरोना पॉझिटिव्हचा खोटा अहवाल सादर
https://t.co/29MJT2j7D5— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021