नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरू आहे. त्यातच आता एक कॉल करून तुम्हाला कोरोना लसीसाठी अपॉईंटमेंट बूक करता येणार आहे. देशभरात 1075 कॉल सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) चे हेड आरएस शर्मा यांनी दिली. नागरिक सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून रेजिस्ट्रेशन करू शकतात आणि स्लॉटही बुक करू शकतात. त्यासाठी सरकारकडून ‘1075’ टोल फ्री नंबर जारी करण्यात आला. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Policy for third-party integration has been announced and it is available on CoWIN. We had published the APIs long ago for third party applications, state govts to use them to create apps for vaccination: RS Sharma, Head, National Health Authority
— ANI (@ANI) May 28, 2021
देशात लसीकरण मोहीम सुरू असून लाखो लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान कोरोना लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) चे हेड आरएस शर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1075 कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. जिथे फोन करून कोरोना लसीसाठी अपॉईंटमेंट बूक करता येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ग्रामीण भागात तंत्रज्ञान आणि इंटरनेट नसल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिक सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून रेजिस्ट्रेशन करू शकतात आणि स्लॉटही बुक करू शकतात. त्यासाठी सरकारकडून ‘1075’ टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे.
डब्ल्यूटीसी फायनल- आयसीसीची मोठी घोषणा, 18 ते 23 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामनाhttps://t.co/OwIfEwzu3D
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये ग्रामीण भागातील लोकांना बाजूला केले जात असल्याचा आरोप शर्मा यांनी फेटाळला आहे. जिल्हाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करत आहेत. तसेच ग्रामीण भागातील लोकांना लसीकरण करण्यास मदत करत आहेत. आर.एस. शर्मा यांनी 45 वर्षांवरील नागरिक हे थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करुन लस घेत आहेत असं म्हटलं आहे. लसीचा पुरवठा कमी असल्याने 18 ते 45 वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र ही तात्पुरती समस्या आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून सात ठार, गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू https://t.co/laJhgxQVf7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021