पुणे : पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, त्यामुळे शनिवार रविवारचा विकेंड लॉकडाऊन रद्द झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पण असं असतानाही पुण्यातील महात्मा फुले मंडईत शुकशुकाट बघायला मिळाला. भाजीपाला आणि मेट्रोच्या कामासाठी असलेल्या पोलीस बंदोबस्ताची पुणेकरांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, 1 जूननंतर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या वेळेत मंडई खुली ठेवण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
भाजपा खासदार रंजीता कोलींवर अज्ञातांकडून सशस्त्र हल्ला https://t.co/HaGbx9dHjU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. येथील विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय लागू होणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. आता शनिवारी आणि रविवारी पुण्यातील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत (4 तास) सुरू राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला असला तरी इतर निर्बंध कायम राहणार आहेत.
फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
पुण्यात 80 % होम आयसोलेशन होत्या. त्या आता 56% पर्यंत आल्या आहेत. त्या आणखी कमी करण्याच्या सूचना, इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन वाढले पाहीजे. ग्रामीण लोकांना तालुक्याच्या सीसीसी मध्ये आणले पाहीजेत. आवश्यक्ता असल्यास नवीन केंद्र सुरु करुन त्यांना आणा. त्यातुन त्यांचे विलगीकरण होईल. तसेच चेकींग पण होणार त्यामुळे ते फायदेशीर “असे टोपे म्हणाले. हे संस्थात्मक विलगीकरण फक्त ज्यांना गृह विलगीकरण शक्य नाही त्यांच्या साठीच असल्याचेही टोपेंनी स्पष्ट केले.
डब्ल्यूटीसी फायनल- आयसीसीची मोठी घोषणा, 18 ते 23 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामनाhttps://t.co/OwIfEwzu3D
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021