सोलापूर : बार्शी – कुर्डुवाडी रोडवरील वांगरवाडीनजीक एका हॉटेलजवळ ट्रक व छोटा हत्ती यामध्ये जोराची धडक होवून या अपघातात दोन जण जागीच मयत तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार सायंकाळी पाऊणेपाचच्या सुमारास घडली.
टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू https://t.co/N50WGZ9c9i
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने ट्रक चालवुन जोराची धडक दिल्या प्रकरणी चालक आश्राप्पा अच्युत माळी ( रा. मुरुड जि. लातूर) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या अपघातात छोटा हत्ती वाहन चालक आशिष अजित सातारकर (रा शितल हॉटेलजवळ, बार्शी ) गणेश हरी काळे (रा लातूर) हे जागीच मयत झाले, तर पुनम पवार रवि पवार, रंजना पवार, कोमल पवार, निलम पवार, मनिषा पवार, अमोल पवार, अमोल बबन पवार ( सर्व रा.पारधी कॅम्प बार्शी ) असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूरला वाली कोणीच नाही! लालफितीचं आता गळफास ठरू लागलीय (ब्लॉग)https://t.co/AdFGbFABlg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
अधिक माहीती की प्रत्यक्षदर्शी प्रताप नवनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की जगताप हे मोटर सायकल वरून आपल्या गावी वांगरवाडी येथे परतत असताना पराग हॉटेल नजीक इक्बाल तांबोळी यांचे शेताजवळ आले असता बार्शीहून ट्रक भरधाव वेगाने जात होता तर कुर्डुवाडीच्या दिशेने येत असलेल्या छोटा हत्तीस जोराची धडक दिल्याने या छोटा हत्ती वाहनातील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
यावेळी स्वतः फिर्यादी ट्रक किन्नर व परिसरातील नागरिकांच्या मदतीने घटना स्थळावरुन जखमींना तात्काळ उपचारासाठी बार्शी येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस पथकांनी भेट देऊन पाहणी केली.
दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कारhttps://t.co/3vtrwdomFN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021