नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोस्ट कोविडच्या लक्षणांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे आजच बारावीच्या परीक्षांबद्दल घोषणा करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतू आता पुन्हा ते लांबणीवर पडलं आहे.
5G विरोधात जुही चावला कोर्टात, दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं https://t.co/KxZEfDJtdp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. आज 12 वी च्या परीक्षेबाबात घोषण होणार होती, ही घोषणाही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
रामदेवबाबांना विरोध, डॉक्टरांकडून आज काळा दिवस #black #day #surajyadigital #ramdevbaba #सुराज्यडिजिटल #Ramdev pic.twitter.com/xPfbxBE3rc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
अशातच रमेश पोखरियाल यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरियाल यांना कोरोना होऊन केला आहे. तसेच कोरोना नंतरच्या प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयाच दाखल करण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 21 एप्रिल रोजी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. तसेच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज सामान्य स्वरुपात सुरु राहील असंही त्यांनी सांगितलं होतं.
लस घेतल्यानंतर अँटीबॉडी बनल्याच नाहीत, पुनावालांविरोधात तक्रार https://t.co/GZSAw5XDTb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
पोखरियाल यांना कोरोनाची लागण झाली होती. 21 एप्रिल रोजी त्यांनी ट्विटरही माहिती दिली होती. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले होते. मंत्रालयाचे कामकाज सामान्य पध्द्तीने सुरू राहील असेही त्यांनी म्हटले होते.
सीबीएसईच्या 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आज मोठा निर्णय होणार होता. केंद्रीय मंत्री पोखरियाल याबाबत माहिती देणार होते, परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने ही घोषणा काही दिवसांनंतर होण्याची शक्यता आहे.
दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कारhttps://t.co/3vtrwdomFN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांनी तयार केलेला रिपोर्ट पंतप्रधानांना देण्यात आला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. तसेच 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी, केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक, कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जाईल. परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करत परीक्षा घेतल्या जाणार आहे.
गुजरातला 1 हजार कोटी, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, रामदास आठवलेंना पवारांचा आणखी एक सल्ला https://t.co/ngphRxsK4t
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021