वाशिंग्टन : अमेरिकेतील दोन महिला वैज्ञानिकांनी जगात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचे दूध तयार करण्यास यश मिळवले आहे. लैला स्ट्रिकलँड आणि मिशेल इग्गेर असं या महिलांचं नाव आहे. या दुधात आईच्या दुधात असणारे प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि अन्य घटक आहेत. याला बायोमिल्क असे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस https://t.co/Y9ciMbkK8K
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
वैद्यकीय अथवा इतर कारणांमुळे नवजात बाळाला आईचे दूध मिळत नाही. अशा बाळांसाठी काही ठिकाणी मिल्क बँक कार्यरत असते. मात्र, आता पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचे दूध तयार करण्यास यश आले आहे. या दुधाला बॉयोमिल्क असे नाव देण्यात आले आहे. या दुधातही आईच्या दुधात असणारे प्रोटीन, फॅटी ॲसिड आणि अन्य घटक आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बॉयोमिल्क तयार करणाऱ्या कंपनीने म्हटले की, हे दूध आईच्या दुधापेक्षाही अधिक पोषक तत्व युक्त आहे. या कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक अधिकारी लैला स्ट्रिकलँड यांनी सांगितले की, हे संशोधन आव्हानात्मक होते. यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे.
या देशातील कोरोना संपला; सर्व निर्बंध हटवले https://t.co/8zYL3INJXF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
* येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल
आईच्या दुधाची निर्मिती करण्याची कल्पनाही लैला स्ट्रिकलँड यांची आहे. त्या गरोदर असताना नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाला जन्म द्यावा लागला. वैद्यकीय अडचणींमुळे त्यांना बाळाला दूध पाजण्यात अडचणी जाणवत होत्या. त्यांच्या शरिरात दूध निर्मिती न झाल्याने बाळाला दूध पाजता येत नव्हते. लैला स्ट्रिकलँड या जीव शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वर्ष २०१३ मध्ये प्रयोगशाळेत त्यांनी पेशी तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये आहार शास्त्रज्ञ मिशेल इग्गेर यांच्यासोबत भागिदारी केली.
या दोघींनीही स्वत:चे स्टार्टअप बॉयोमिल्क लाँच केले. फेब्रुवारी २०२० मध्ये दोन्ही शास्त्रज्ञांनी दुधात आढळणारे दोन पदार्थ शर्करा आणि केसीनची निर्मिती केली आहे. त्यानंतर आईचे दूध प्रयोगशाळेत तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल असे त्यांनी म्हटले.
जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021