नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरत्या किमती लक्षात घेता या हंगामातील तेलबियांची लागवड पूर्ण झाल्यानंतरच तेल आयात करातील कपात करणे हिताचे राहील. आयात कर कमी केल्यानंतर तेलाच्या किमती झपाट्याने घसरतील, असं सोयाबीन एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले आहे. त्यामुळे तुर्तास तरी तेल आयात करात कपात न करण्याची मागणी होत आहे.
सिंगलच बरं आहे, काहीही झालं तरी लग्न नकोच – तुषार कपूर https://t.co/JXQJQwmsuj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
सध्या तेल आयातीवर १५ टक्के शुल्क लागते. सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात मागील दहा दिवसांत कच्च्या पामतेलाचे दर प्रतिटन १,२५० डॉलरवरून घसरून १,१५० डॉलरवर आले आहे. सोयाबीन तेल १,४८० डॉलवरून १,३८० डॉलरवर, तर सूर्यफूल तेल १०० डॉलरनी घसरून १,५५० डॉलरवर आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जागतिक बाजारातील खाद्यतेलांच्या घसरत्या किमतींचा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांत प्रतिकूल संदेश जाऊ नये, यासाठी खाद्यतेलावरील आयात कर कमी करण्याचा निर्णय तूर्त पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी तेल उद्योग क्षेत्राकडून करण्यात आली आहे. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती मागील १० दिवसांत ६ ते ८ टक्क्यांनी उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही मागणी आली आहे.
राहुल गांधींनी एकाच दिवशी ट्विटरवर 'या' लोकांना केलं अनफॉलो https://t.co/kutqTQYAXG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
सोयाबीन एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरत्या किमती लक्षात घेता या हंगामातील तेलबियांची लागवड पूर्ण झाल्यानंतरच तेल आयात करातील कपात करणे हिताचे राहील. आयात कर कमी केल्यानंतर तेलाच्या किमती झपाट्याने घसरतील.
महिला शास्त्रज्ञांची कमाल; प्रयोगशाळेत तयार केले आईचे दूध, येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल https://t.co/0iCEEAQ3d4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021